Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
महाराष्ट्र

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Goa Made Liquor Seized: सातारा आणि सोलापूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल 48 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीचे मद्य आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

Manish Jadhav

Goa Liquor Seized: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली. सातारा आणि सोलापूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल 48 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीचे मद्य आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या. हे मद्य गोव्याहून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणले जात होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सातारा (Satara) आणि सोलापूर या दोन्ही महामार्गांवर नाकाबंदी करुन सापळा रचला. गोव्याहून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात बनावट मद्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या साहित्यामध्ये केवळ मद्याच्या बाटल्याच नाहीत, तर तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने आणि इतर साहित्याचाही समावेश आहे. या सर्व मद्याची किंमत 48 लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या तस्करीप्रकरणी पोलिसांनी (Police) पाच जणांना जागीच ताब्यात घेऊन अटक केली. हे आरोपी मोठ्या टोळीचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये हा माल पोहोचवला जाणार होता, याचा तपास आता उत्पादन शुल्क विभाग करत आहे. अवैध मद्यविक्रीमुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होते, त्यामुळे अशा कारवायांना वेग देण्यात आला आहे.

पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून होणारी मद्याची तस्करी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व मुख्य महामार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. "आम्ही अशा तस्करी विरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT