महाराष्ट्रात या वर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळले. तसेच 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने गणेशोत्सवात सहभागी होताना काळजी घेण्याचे आवाहन केले. विभागाने सांगितले की ही प्रकरणे 19 जिल्ह्यांमध्ये नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 770 प्रकरणे आणि 33 मृत्यू पुण्यात झाले आहेत.
सणासुदीच्या काळात लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गणेश चतुर्थीला होणारी गर्दी पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने केले आहे. विशेषत: इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले आहे.
मुंबईत 348 प्रकरणे आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे, तर ठाण्यात 474 प्रकरणे आणि 14 मृत्यू आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, या कालावधीत कोल्हापुरात 159 प्रकरणे आणि 13 मृत्यूची नोंद झाली आहे.
यावर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे 2 हजार 337 रुग्ण आढळून आले असून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण पाहता नागरिकांनी गणेशोत्सवात सावधगिरी बाळगली पाहिजे.
ते म्हणाले की इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तर उच्च जोखीम असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे (Corona) नियम पाळावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.