Goa Rain Updates | Goa Weather News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Rain: आजही मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा

Maharashtra Rain Update: विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा आहे.

दैनिक गोमन्तक

देशात मुसळधार पाउस सुरू आहे. तर विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येलो अलर्टता इशारा

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे. तर वर्धामध्ये फक्त आज तर अमरावती आणि अकोलामध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

* सर्वसामान्यांसह आता बळीराजाही कंटाळला

विदर्भात हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असून त्यानंतर हळू हळू पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान नागपूर शहरात सोमवारी सकाळच्या सुमारास रिमझिम पावसानंतर काही वेळाच्या विश्रांतीनगर पुन्हा पाऊस सुरु झाला. दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसर जोरदार पाऊस बरसल्याने नागपुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते व चौक पुन्हा जलमय झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

SCROLL FOR NEXT