महाराष्ट्र लोकसेवा आयोग Dainik Gomantak
महाराष्ट्र

MPSC Result : फेरनिकाल 31 जुलैपर्यंत

सप्टेंबर महिन्यात संयुक्त पूर्व परीक्षा (Exam) आणि राज्य सेवेची प्रमुख परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे नियोजन (Planning) केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) प्रलंबित 2019 मधील परीक्षा (Result) आणि 2020 मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार. तसेच सप्टेंबर महिन्यात संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्य सेवेची प्रमुख परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे नियोजन (Planning) केले जात आहे. सध्या नवीन आलेल्या मागणीनुसार (Demand) नवीन परीक्षांचे वेळापत्रक देखील तयार केले जात आहे अशी माहिती (Information) आयोगाच्या सचिव स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाचे आरक्षण हे रद्द झाल्यानंतर सरकारने एसईबीसीमधील उमेदवाराना ईडब्ल्युएस आणि खुल्या वर्गातून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगाकडून झालेल्या 13 परीक्षांचा निकाल पुन्हा जाहीर करावा लागणार आहे. त्यात प्रारंभी वनसेवा, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिक इंजिनियर अशा परीक्षांचे निकाल लावले जातील. त्याचबरोबर मुख्य परीक्षांचे निकल जाहीर केल्यानंतर त्या संबंधित उमेदवाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे, असे आयोगाकडून माहिती मिळाली आहे. नव्या मागणी पत्रात एसईबीसी वगळून ईडब्युएस आणि खुल्या प्रवर्गासाठीच्या जागा वाढविल्या आहेत. परंतु, धनगर आणि वंजर या समाजातील उमेदवारांच्या जागेत कमी झाल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात निर्णय आयोगाकडे नाही. यात सामान्य प्रशासनाकडून बदल करणे अपेक्षित आहे. दरम्यान, या महामारीच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बऱ्याच उमेदवारांची वयोमार्यादा संपण्यात आली आहे.त्यामुळे त्यांना 1 ते 2 परीक्षांची वाढीव संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेसह त्या उमेदवारांनी सरकारकडे केलेलि आहे. यावर अजून देखील निर्या सरकारकडून आलेला नाही.

राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील प्रलंबित परीक्षा कधी घेता येतील, यासंदर्भात आयोगाने आपत्ति व्यवस्थापनाला पत्र पाठविले आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नाही. मुंबईसोबत अनेक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे ऑगस्टमधील परीक्षा घेणे शक्य नाही. यामुळेच संयुक्त पूर्वपरीक्षा सप्टेंबर महिन्यात तर राज्य सेवेची मुख्य परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे आयोगाने नियोजन केले आहे. तसेच नवीन मागणीपत्रानुसार सामान्य प्रशासन विभागपासून नवीन परीक्षांचे वेळापत्रक एकचवेळी जाहिल केले जातील. राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या पूर्व परीक्षांचे निकाल 15 दिवसात जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. तसेच सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिक इंजिनियर , वनसेवासह अनेक परीक्षांचे निकाल त्यावेळी जाहीर केले जातील. यानंतर हळूहळू परीक्षांचे वेळाप्रत्रक देखील जाहीर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT