Supreme Court  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र सत्तासंघर्ष! शिंदे, ठाकरे गटासाठी आज महत्वाचा दिवस; SC च्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्रातील संत्तासंघर्ष मागील अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

Pramod Yadav

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील संत्तासंघर्ष मागील अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आज (शुक्रवारी) या प्रकरणी एक महत्वाची सुनावणी होणार आहे.

संत्तासंघर्षावर सात न्यायाधीशांचे घटनापीठ निर्णय देणार की पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोरच या प्रकरणाची सुनावणी होणार याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. यावर आज निर्णय होणार आहे. या निर्णयाकडे शिंदे, ठाकरे गटाच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

नवाब रेबिया केस संदर्भात युक्तीवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात तीन दिवस सूनावणी झाली. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील 'नबाम रेबिया' निकालाच्या फेरविचारासाठी सात सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.

नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी केला. तर, उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी याला प्रतिवाद केला. शिंदे गटाने 21 जून रोजी विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात दिलेली अविश्वास नोटीस हा खोडसाळपणा आहे. असे सिबल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी पक्षीय राजकारणामध्ये पडण्याची गरज नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी नोंदविले होते.

राज्यपाल सरकार स्थापनेबाबत असे कसे बोलू शकतात? सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल विश्वासदर्शक ठराव आणण्यास सांगतात. राज्यपालांनी राजकारणाच्या क्षेत्रात शिरण्याची गरज नाही. असेही चंद्रचूड म्हणाले.

नवाब रेबिया संदर्भात शुक्रवारी 10.30 वाजेच्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

SCROLL FOR NEXT