Deepak Kesarkar : राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

शिक्षकांवरील भार कमी करण्याच्या दृष्टीने सरकारकडून महत्वाचे निर्णय
School News
School NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या रत्नागिरीत प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन सुरु असून या 17 व्या अधिवेशनाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. या समारंभाप्रसंगी केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देण्यात येणार असून राज्यातील केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच शिक्षकांवरील भार कमी करण्यात येणार असून शिक्षकांची अशैक्षणिक कामे वगळण्याचा जीआर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आता डॉक्टरांच्या गाडीवर DR असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर TR असे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी संकेत दिलेत.

School News
अन् अमेरिकेच्या मदतीने मुंबईतील इंजिनिअरचा जीव बचावला; NCB, CBI आणि मुंबई पोलिस आले एकत्र

तसेच अन्य शालेय सुविधांबाबत बोलताना केसरकर म्हणाले, यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. मुलांसाठी असलेल्या टॉयलेट्स आणि शालेय कंपाउंडसाठी 590 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्नशील असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com