Nitin Deshmukh News Updates
Nitin Deshmukh News Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

माझं अपहरण झालं होतं; शिवसेना आमदाराने केला दावा

दैनिक गोमन्तक

विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालेल्या नाट्यमय घडामोडी अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीत. कारण शिवसेनेत फूट पडली आहे. आणि नॉट रिचेबल नेते गुजरातमधील सुरतमध्ये थांबले असल्याची माहिती ही समोर आली होती. यानंतर हे नेते आता काय निर्णय घेणार हे समजायला मार्ग नाही. असे असताना शिवसेना बंडखोर आमदार नितीन देशमुख यांनी आपलं अपहरण झालं होतं. आणि आपल्याला सुरत येथे नेण्यात आले होते असा दावा केला आहे. ( Maharashtra political crisis Shivsena MLA Nitin Deshmukh says I had been kidnapped )

असे असले तरी राजकिय संकटाच्या काळात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. या पूर्वी देशमूख यांना शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी एक असल्याचं मानलं जात होते. मात्र आता देशमुख यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामूळे शिवसेना सोडण्याच्या तयारीत असलेले नेते काेण ? आणि शिवसेनेसोबत कायम असलेले नेते कोण ? हे सांगणे सध्याच्या घडीला सांगणे कठिण.

नितीन देशमुख यांनी आपलं अपहरण झालं होतं हे सांगताना स्पष्ट केले की, मी तेथुन पळून गेलो आणि पहाटे 3 च्या सुमारास रस्त्यावर उभा होतो. यावेळी लिफ्ट मागण्याचा प्रयत्न केला होतो, मात्र यापुर्वीच शंभरहून अधिक पोलीस आले आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण आपल्याला कोणताही आजार नाही. असे ही ते म्हणाले

शिवसेनेने आज सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. अशी माहिती ही समोर आली आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले की, आपली उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांचा विश्वास आहे की, जे आमदार गेले आहेत. ते परत येतील. सध्या तरी विधानसभा विसर्जित करण्यासारखे काही नाही. असे ही ते यावेळी म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT