Eknath Shinde
Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: बंडखोर आमदार गुवाहाटीत इनडोअर गेम्समध्ये मशगुल

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. 40 हून अधिक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा शिंदेंनी दावा केला आहे. महाराष्ट्रातील हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामी आहेत. (Maharashtra Political Crisis Rebel Mlas Luxurious Hotel Guwahati Do These Things To Keep Themselves Busy)

दरम्यान, शिंदे आणि शिवसेना यांच्यात सुरु झालेल्या राजकीय युद्धाला आठवडा होत आला आहे. दोघांमधील हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे, हा लढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या आठवडाभरापासून बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये कैद आहेत. ते कडेकोट बंदोबस्तात राहत आहेत. हे आमदार हॉटेलमध्ये कसा वेळ घालवतात आणि दिवसभर काय करतात याची तुम्हाला माहिती आहे का?

आमदार इनडोअर गेम्स खेळतात

महाराष्ट्रातील बंडखोर आमदार बुद्धिबळ, लुडोसह विविध इनडोअर गेम्स खेळून आपला वेळ घालवत आहेत. आमदारांच्या निकटवर्तीय एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर मीडियाला सांगितले की, काही बैठकांव्यतिरिक्त, गुवाहाटीमध्ये ते कोणत्याही प्रकारच्या राजकीय बैठकामध्ये सहभागी होत नाहीत. वेळ घालवण्यासाठी, ते स्वतःला बुद्धिबळ आणि लुडोसह विविध इनडोअर खेळत आहेत.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांना हॉटेलबाहेर जाण्याची परवानगी नाही. सुरुवातीला सुमारे आठवडाभरासाठी आमदारांनी हॉटेलच्या खोल्या बुक केल्या. आसाममधील भाजपचे (BJP) आमदार, नेते आणि मंत्री अधूनमधून हॉटेलला भेट देतायेत.

उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सोमवारी गुवाहाटीस्थित नऊ बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली. तर दुसरीकडे, बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने उपसभापतींनी त्यांच्याविरुद्ध सुरु केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला 11 जुलैपर्यंत स्थगिती दिली.

शिवाय, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारविरोधात बंड पुकारुन एक आठवडा झाला आहे. 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन्ही गट त्यांच्या भूमिकेवर ठाम असून दीर्घ लढाईसाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT