Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

राजकीय चक्रव्यूहात अडकले मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरे', तिहेरी हल्ल्यामुळे अडचणी वाढल्या

महाराष्ट्राच्या राजकीय संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकीय संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अडचणी वाढत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार आज (मंगळवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात. हे आमदार राज्यपालांची कधी भेट घेणार हे अद्याप ठरलेले नाही (maharashtra political crisis eknath shinde independent mla can meet governor bhagat singh koshyari)

दरम्यान, गुवाहाटीमध्ये तळ ठोकून बसलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. ते राज्यपालांना भेटून ठाकरे सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचे पत्र देऊ शकतात. तर दुसरीकडे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयांची माहिती मागवली आहे.

राज्यपालांनी पत्र लिहून माहिती मागवली

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी सांगितले की, 'राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून 22-24 जूनपर्यंत राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व सरकारी निर्णय (GRs) आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे.' सत्ताधारी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या (Congress) ताब्यातील विभागांनी 22 ते 24 जूनपर्यंत विविध विकासकामांसाठी शेकडो कोटी रुपये देण्याचे सरकारी आदेश दिल्यानंतर माहिती देण्याच्या सूचना आल्या आहेत. पत्रानुसार, 'राज्यपालांनी 22-24 जून रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या GR, परिपत्रकांबाबत 'संपूर्ण पार्श्वभूमी माहिती' देण्यास सांगितले आहे....'

मुख्यमंत्री ठाकरेही कारवाईत

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची खुर्ची धोक्यात आली आहे. सोमवारी त्यांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या 9 बंडखोर मंत्र्यांचे खाती काढून घेतली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारविरोधात बंड पुकारुन एक आठवडा झाला आहे. 36 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन्ही बाजू त्यांच्या भूमिकेवर ठाम असून दीर्घ लढाईसाठी तयार आहेत.

एका अधिकृत निवेदनानुसार, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीमध्ये तळ ठोकून बसलेल्या बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांना देण्यात आली आहेत, जेणेकरुन प्रशासन चालवणे सोपे होईल. शिवसेनेकडे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि सुभाष देसाई यांच्यासह चार कॅबिनेट मंत्री आहेत.

दुसरीकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते देण्यात आले आहे. तर उदय सामंत यांच्याकडे उच्च शिक्षण खाते होते ते आता आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्याचवेळी गुलाबराव पाटील यांच्याकडून पाणीपुरवठा खाते काढून अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे.

त्याचबरोबर, संदीपान भुमरे यांचा फलोत्पादन विभाग आणि दादा भुसा यांचा कृषी आणि माजी सैनिक कल्याण विभाग शंकरराव गडाख यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यात आलेले खाते संजय बनसोडे (गृह-ग्रामीण) आणि विश्वजित कदम (वित्त, नियोजन आणि कौशल्य विकास) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

दुसरीकडे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे खाते विश्वजित कदम (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), प्राजक्त तनपुरे (वैद्यकीय शिक्षण व वस्त्रोद्योग), सतेज पाटील (अन्न व औषध प्रशासन) आणि अदिती तटकरे (अन्न व औषध प्रशासन) यांना देण्यात आले आहे.

तर, अन्य राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते ओमप्रकाश कडू यांच्या खात्याचा कार्यभार (बच्चू कडू) आदिती तटकरे (शालेय शिक्षण), सतेज पाटील (जलसंपदा), संजय बनसोडे (महिला व बालविकास) आणि दत्तात्रेय भरणे (इतर मागासवर्गीय विकास) यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT