Rebel MLA's of the Shiv Sena Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बील कोण भरत आहे ?

भाजपा हा खर्च करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट मागील 6 दिवसांपासून आसाम मधील पंच तारांकित हॉटेलमध्ये तळ ठोकून बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आमदारांचा एका दिवसाचा खर्च 8 लाख रुपये आहे.

हा खर्च कोण करत आहे, असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. भाजपा हा खर्च करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मात्र, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत खुलासा केला आहे.

भाजपा किंवा आसाम सरकार या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बील देत नसल्याचे सारमा यांनी स्पष्ट केले आहे. भाजपा किंवा आसाम सरकार हॉटेलचे बील का देईल? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाने आता वेगळे वळण घेतले आहे. शिंदे गट आणि शिवसेना न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे संजय राऊत 21 बंडखोर आमदारांच्या संपर्कात असल्याचे सांगत आहेत. हा सत्ता संघर्ष आता कोणते वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT