Maharashtra Police
Maharashtra Police  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Police: या जिल्ह्यांमध्ये महिला पोलिसांसाठी कामाचे तास झाले कमी

दैनिक गोमन्तक

नागपूर शहरात महिला पोलिसांना (Women police)प्रायोगिक तत्त्वावर आठ तासाची ड्युटी दिली या उपक्रमानंतर पोलीस महासंचालक (Director General of Police) संजय पांडे यांनी या निर्णयाबाबत विचार करावा अशी सूचना दिल्या आहेत.

त्यानंतर लगेचच पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police)महिला कर्मचाऱ्यांची ड्युटी आठ तासांची जाहीर केली. त्यापाठोपाठ हा घेऊन त्यावर अंमलबजावणी (Implementation)करणारे अमरावती हे तिसरे ठिकाण बनले आहे.

पोलीस दलातील महिलांना 12 तास ऐवजी आठ तासाची ड्युटी देण्याचा मोठा निर्णय आता पुणे आणि नागपूर पाठोपाठ अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घेतला आहे. चार तासांची ड्युटी कमी होत झाल्यामुळे महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आनंदाची बाब म्हणजे त्याची अंमलबजावणी उद्यापासूनक्सह सुरु होईल. यात 275 महिलांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

नागरिकांसाठी पोलीस दलात आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असलेल्या महिलांना 12 तास काम करावे लागत आहे. महिला कर्मचाऱ्यांना ड्युटीबरोबर आपली कौटुंबिक जबाबदारी (Family responsibilities) सुद्धा पार पाडावी लागत असते. सण-उत्सवाचा बंदोबस्तात गंभीर गुन्हे झाल्यानंतर अनेक वेळा त्यांना 12 तासापेक्षा जास्त वेळ आपले कर्तव्य बजावावे लागत असते. आणि यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर मोठा परिणाम होत असतो. असे निदर्शनास ही आले आहे. यामुळे पोलीस विभागाने महिलां कर्मचाऱ्यांना बारा तास च्या ऐवजी आठ तासाची ड्युटी केला आहे. त्यामुळे महिलांना चार तासाची सूट मिळाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद झाला आहे.

याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांनी आसा अत्यंत चांगला उपक्रम राबवावा. या निर्णयामुळे महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळेल अशी अशा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT