Shivsena Sanjay Raut tweets Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut ED Raid: ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांचे बॅक टु बॅक 4 ट्वीट;म्हणाले....

Patra Chawl land scam case: ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case) संजय राऊत यांची मैत्री घरात चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत यांनी बॅक टु बॅक ट्वीट केले आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यांनी केलेले पहिले ट्वीट (Tweet) 'तरीही शिवसेना सोडणार नाही'

संजय राऊत यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहीले 'खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र'

संजय राऊत यांनी तिसऱ्या ट्वीटमध्ये लिहीले, "कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन."

संजय राऊत यांनी चौथ्या ट्वीटमध्ये लिहीले, "शिवसेना झिंदाबाद!!! लढत राहीन.."

संजय राऊत यांच्या मुंबईतील 'मैत्री' घरी ईडीचे पथक दाखल झाल्याचे समजताच विभागातील शिवसैनिकांनी राऊतांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात केली. काही शिवसैनिकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. परिसरात सध्या तणावाची स्थिती आहे.

काय आहे पत्रा चाळीचे प्रकरण
2007 मध्ये गुरू आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला पत्रा चाळीच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. या योजनेंतर्गत 47 एकर जागेवर चाळीऐवजी फ्लॅट बनवण्यात आले. या करारानुसार चाळीतील रहिवाशांना 672 सदनिका देण्यात येणार होत्या. याशिवाय तीन हजार फ्लॅट म्हाडाला द्यायचे होते. करारानुसार उर्वरित जमिनीवर बांधकाम कंपनी घर बांधून विकू शकत होती.

मात्र, या प्रकरणात संपूर्ण 47 एकर जमीन 1034 कोटींना विकल्याचा आरोप आहे. आरोपानुसार कंपनीने फ्लॅट बांधला नाही. या प्रकरणी ईडीने (ED) प्रवीण राऊत आणि त्याचा सहकारी सुजित पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण राऊत, गुरु आशिष हे बांधकाम कंपनीचे माजी संचालक आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मित्र असल्याचे समजते.

प्रवीणच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे. तर सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. याशिवाय पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीवर सामाईक जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दाट धुक्यामुळे अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन दरीच्या टोकावर थांबला; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

Goa Assembly Live: मुद्रण आणि स्टेशनरी विभागांतर्गत 5 डिजिटल उपक्रम सुरू

Amazon-Flipkart Sale: स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत... ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही; ॲमेझॉन-फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'चं बिगुल वाजलं!

Surya Grahan Astrology: 2 ऑगस्टला सूर्य ग्रहण पाळावं का? हिंदू पंचांगात दिलेली माहिती वाचा; ग्रहणाचे नियम व अटी जाणून घ्या

RORO Ferry Service: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होतेय मुंबई-सिंधुदुर्ग 'रो-रो'सेवा; किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT