ED चं धाडसत्र सुरुच! संजय राऊत पुन्हा एकदा ईडीच्या रडारावर

Sanjay Raut News: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर इडीने रविवारी छापा टाकला.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानावर इडीने रविवारी छापा टाकला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात सहकार्य न केल्याने ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी (Patra Chawl land scam case) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला सहकार्य न केल्याबद्दल ईडी खासदारांच्या घरी पोहोचली.

Sanjay Raut News
MSEB Recruitment: मराठा उमेदवार 10 टक्के आरक्षणापासून राहणार वंचित

यापूर्वी 20 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दाखला देत ते ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत. गेल्या आठवड्यात, राऊतच्या वकिलाने ईडी अधिकार्‍यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या अशिलाला समन्स बजावण्याची विनंती केली होती, परंतु केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना फक्त एक आठवड्याचा वेळ दिला होता.

काय आहे पत्रा चाळीचे प्रकरण
2007 मध्ये गुरू आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला पत्रा चाळीच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. या योजनेंतर्गत 47 एकर जागेवर चाळीऐवजी फ्लॅट बनवण्यात आले. या करारानुसार चाळीतील रहिवाशांना 672 सदनिका देण्यात येणार होत्या. याशिवाय तीन हजार फ्लॅट म्हाडाला द्यायचे होते. करारानुसार उर्वरित जमिनीवर बांधकाम कंपनी घर बांधून विकू शकत होती.

मात्र, या प्रकरणात संपूर्ण 47 एकर जमीन 1034 कोटींना विकल्याचा आरोप आहे. आरोपानुसार कंपनीने फ्लॅट बांधला नाही. या प्रकरणी ईडीने (ED) प्रवीण राऊत आणि त्याचा सहकारी सुजित पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण राऊत, गुरु आशिष हे बांधकाम कंपनीचे माजी संचालक आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मित्र असल्याचे समजते.

प्रवीणच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे. तर सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. याशिवाय पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीवर सामाईक जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com