School Bus Price Hike Dainik Gomantak
महाराष्ट्र

School Bus: पालकांच्या बजेटला कात्री! स्कूल बसच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

school bus price hike: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या शुल्कात वाढ केल्यामुळे पालकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात आधीच वाढलेल्या महागाईचा सामना करणाऱ्या पालकांना दरवाढीचा आणखी एक झटका बसणार आहे. स्कूल बस चालकांनी स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बसच्या दरात 20 टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. (maharashtra news school bus operators hike 20 percent school bus)

इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. त्याचा फटका आता स्कूल बस चालकांना बसला आहे. कोरोना महामारीच्या (Corona) काळात दोन वर्ष स्कूल बस बंद होत्या. या दरम्यानचा देखभाल खर्च देखील मोठा होता. स्कूल बस (School Bus) ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यातच आम्ही स्कूल बसच्या शुल्कात 30 टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेणार होतो. पण पालकांची अडचण होऊ नये यासाठी ही दरवाढ 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रात्रीस खेळ चाले! पिर्णा रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य; Viral Videoतून 'संपेल ना कधीही हा खेळ सरकारचा' गाणं हिट

VIDEO: यशस्वी जयस्वालची 'तेरे नाम' हेअर स्टाईल, विराट कोहलीने उडवली खिल्ली; पाहा खेळाडूंची ऑन-कॅमेरा मस्ती

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Goa Live News: भाजप-मगोप युती अंतिम! मगोपला 3 जागा, भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार: मुख्यमंत्र्यांची घोषणा

Tamil Nadu Bus Crash: तामिळनाडूमध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर, 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT