Maharashtra Navnirman Sena Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आंदोलन; रस्त्यावरच भरवली शाळा!

Maharashtra Navnirman Sena: मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावरुन मनसे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पनवेल येथील पळस्पे फाट्याजवळ मनसकेडून आंदोलन करण्यात आले.

Manish Jadhav

कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग तीन दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. यातच आता, मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावरुन मनसे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

पनवेल येथील पळस्पे फाट्याजवळ मनसकेडून आंदोलन करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेने हे आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बसून चक्क शाळाच भरवली. मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यावेळी हेडमास्टर झाले तर मनसे कार्यकर्ते विद्यार्थी झालेले पाहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर प्रकाश टाकला होता.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मनसेने अनेक आंदोलने केली. या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारला धारेवर धरले. गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग बनवण्याचे काम सुरु आहे, मात्र तो अद्याप तयार झालेला नाही. त्याचे काम अपूर्णच आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येथे सुरु असलेले जमिनीचे व्यवहार हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले होते. कोकणी लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत.

जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जातील. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एकदा रस्ता झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात हे समजून घ्या, असेही राज यांनी यापूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT