IPL Cricket 2022 News, MNS activists damage IPL team bus News Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी केला IPL खेळाडूंच्या बसवर हल्ला

दक्षिण मुंबईतील एका हॉटेलबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

दैनिक गोमन्तक

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) एका हॉटेलबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या आयपीएल खेळाडू (IPL Players) आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी आलेल्या बसवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील एका आलिशान हॉटेलबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर हल्ला केला. या कार्यकर्त्यांनी बसचे मोठे नुकसान केल्याचीही माहिती पोलिसांना दिली आहे. यावेळेस आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होणार आहेत. (MNS activists damage IPL team bus News Updates)

दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातील हॉटेल ताजबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी बसेसची तोडफोड केली. बसवर 'मनसे हिट'चे पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व्यावसायिकांना मुंबईत नेण्याचे काम न सोपवल्याने मनसे परिवहन सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राबाहेरून कंत्राटी पद्धतीने बसेस आणल्या असून त्याचा फायदा बाहेरच्या राज्यातील लोकांना होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

मनसे कार्यकर्ते का संतापले आहेत?

आयपीएल दरम्यान खेळाडूंना आणण्यासाठी आणि नेण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. मात्र या बसेस महाराष्ट्राबाहेरून आणल्या जातात. राज्यात बसचालकांना हे काम दिले जात नाही. मात्र, आयपीएल खेळाडूंच्या वाहतुकीचे काम स्थानिक वाहतूकदारांना द्यावे, अशी मागणी मनसेने यापूर्वी केली होती. परंतु ही मागणी पुर्ण न झाल्याने मनसे कार्यकर्ते काल संतापले. आणि त्यांना बसची तोडफोड केली.

आयपीएलची तयारी सुरू झाली आहे

आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने मंगळवारपासून 2022 च्या IPL हंगामाची तयारी सुरू केली. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याच्या 12 दिवस आधी नवी मुंबईतील रिलायन्स जिओ स्टेडियमवर अनुकूलन शिबिर सुरू झाले आहे. पहिल्या सराव सत्रापूर्वी संघाचे क्रिकेट संचालक आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे मूल्यमापन करण्यात आले. झहीर आणि जयवर्धने यांच्यासह कोचिंग स्टाफमध्ये शेन बाँड, रॉबिन सिंग, किरण मोरे, राहुल संघवी, विनय कुमार, टीए सेकर, पॉल चॅपमन आणि डेटा विश्लेषक सीकेएम धनंजय यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT