IPL 2022: CSK ठरला IPL मध्ये सर्वाधिक प्लेऑफ खेळणारा संघ, टॉप-4 मध्ये बोलबाला

किंग्ज ! CSK ठरला IPL मध्ये सर्वाधिक प्लेऑफ खेळणारा संघ
IPL 2022
IPL 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL Latest News: आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यास दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यामध्ये 10 संघ सहभागी होत आहेत. यावेळी आठ जुन्या संघासह, लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघ आयपीएल ट्रॉफीसाठी रिंगणात आहेत. मात्र, दरवेळेप्रमाणे या वेळीही प्रत्येक संघाला साखळी फेरीत केवळ 14 सामने खेळायचे आहेत.

प्लेऑफचा फॉरमॅट प्रत्येक वेळी सारखाच असतो, म्हणजेच यावेळीही प्लेऑफमध्ये दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या 14 हंगामात आतापर्यंत केवळ काही संघ असे आहेत ज्यांनी सलग प्लेऑफ सामन्यांमध्ये स्थान निश्चित केले आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या क्रमांकावर आहे. (CSK has played the most playoff matches in the IPL)

IPL 2022
ICC Women's ODI Ranking: मिताली राज ची घसरगुंडी, मंधाना टॉप 10 मधून बाहेर

हे चार संघ सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत

1. चेन्नई सुपर किंग्स: दोन वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबित असूनही, CSK चा संघ सर्वाधिक प्लेऑफ सामने खेळणारा संघ आहे. CSK ने 24 प्लेऑफ सामने खेळले आहेत. आयपीएल-2020 पर्यंत हा संघ प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. CSK ने आतापर्यंत 4 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे.

2. मुंबई इंडियन्स: मुंबई इंडियन्स (Mumbai Indiance) हा सर्वात जास्त आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. मुंबईने हे विजेतेपद 5 वेळा जिंकले आहे. मात्र, सर्वाधिक प्लेऑफ खेळण्याच्या बाबतीत हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत 18 प्लेऑफ सामने खेळले आहेत. आयपीएलचे सुरुवातीचे सीझन मुंबईसाठी खास नव्हते, त्यामुळेच मुंबई या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2013 मध्ये पहिली ट्रॉफी जिंकल्यापासून मुंबई सातत्याने प्लेऑफमध्ये पोहोचत आहे. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर गेल्या वर्षी या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.

3. कोलकाता नाइट रायडर्स: कोलकाता संघाने (KKR) आतापर्यंत 13 प्लेऑफ सामने खेळले आहेत. सुरुवातीच्या मोसमातील अपयशानंतर, केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. येथून केकेआरने जवळपास प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. सन 2011, 2016, 2017 मध्ये एलिमिनेटर सामन्यात ती पराभूत झाल्यानंतर बाहेर पडली होती, तर 2018 मध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात तिचा पराभव झाला होता. गेल्या मोसमात हा संघ उपविजेता ठरला होता.

4. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: आरसीबीने (RCB) आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही परंतु प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या बाबतीत ते केकेआरच्या बरोबरीचे आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 प्लेऑफ सामने खेळले आहेत. 2009, 2011 आणि 2016 मध्ये तो अंतिम फेरीत पोहोचली होता आणि 2010 आणि 2015 मध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता. गेल्या दोन मोसमातही तो टॉप-4 मध्ये पोहोचला होती, पण एलिमिनेशन मॅचमध्ये त्या संघाला बाहेर पडावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com