Nawab Malik and Anil Deshmukh Dainik Gomantak
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला मोठा झटका, राज्यसभा निवडणुकीला अनिल देशमुख अन् नवाब मलिक मुकणार

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची न्यायलयाने याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता त्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी लवकरात लवकर न्यायालयाच्या आदेशाची प्रत मागितली आहे जेणेकरुन आपण उच्च न्यायालयात दाद मागू शकू.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीपूर्वी हा महत्वाचा निर्णय आला आहे. कारण या निवडणुकीत प्रत्येक मत मोजले जाते. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक केल्यापासून तुरुंगात असल्याची माहिती आहे.

तसेच, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दोघांनीही एक दिवसाच्या जामिनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही निवडून आलेले आमदार आहोत. राज्यसभेवर प्रतिनिधी निवडताना आपल्या मतदारसंघातील रहिवाशांचे प्रतिनिधित्व करण्यास बांधील आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT