maharashtra liquor party was running in police station constables ran away after seeing the public see video Dainik Gomantak
महाराष्ट्र

पोलीस चौकीत सुरू होती दारूची पार्टी, व्हिडिओ व्हायरल

4 पोलीस हवालदारांना निलंबित करून या प्रकरणाचा तपास सुरू

दैनिक गोमन्तक

नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात पोलीस मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले. यावेळी सर्वसामान्य जनता गंगापूर पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा तिथे उपस्थित पोलीस हवालदार दारू पिताना दिसले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी 4 पोलीस हवालदारांना निलंबित करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार पोलीस कर्तव्य संपवून पोलीस (police) ठाण्यात दारू पीत होते, त्यांचा व्हिडिओही सापडला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गंगापूर पोलीस ठाण्यात पोलीस मद्यप्राशन करत असल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने स्वत: घटनास्थळ गाठून हा व्हिडिओ (video) बनवला. नशेच्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याला सरळ उभेही राहता येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

त्यानंतर एक व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचते आणि पोलिसांना प्रश्न विचारते. यानंतर पोलिस तेथून पळून जातात, तर स्टेशनच्या टेबलावर दारूच्या बाटल्या आणि इतर वस्तू ठेवलेल्या दिसतात.

या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी पोलिसांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले, मात्र त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. ड्युटी संपल्यानंतर हे चार हवालदार पोलिस ठाण्यातच दारू पिऊन बसले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून ते लवकरच त्याचा अहवाल देतील, असे पोलिस (police) आयुक्तांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT