महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न (Maharashtra-Karnataka Border Dispute) मागील काही दिवसांपासून चिघळला आहे. सीमावादावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बेळगावच्या सीमेला लागून असलेल्या कोल्हापुरात (Kolhapur) देखील याचे पडसादर पाहायला मिळत आहेत. तसेच, कोल्हापुरमध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. यावरून आता जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. आजपासून म्हणजे 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी केलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये याप्रकरणी मुंबईत महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.