Rajasthan: लग्नाची वरात निघणार एवढ्यात; पाच सिलेंडरचा स्फोट, नवऱ्यामुलासह 60 जण जखमी, चौघांचा मृत्यू

60 जखमींपैकी 51 जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जण 90 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. वॉर्डमध्ये 48 जण दाखल आहेत, 1 मुलगा आयसीयूमध्ये आहे.
Rajasthan
RajasthanDainik Gomantak

Rajasthan Cylinder Blast In Wedding: राजस्थान, जोधपूर येथे एका लग्न समारंभात 5 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात नवरदेवासह त्याची आई-वडिलांसह 60 जण भाजल्याने जखमी झाले आहेत. तर, चारजणांचा मृत्यू झाला असून, यात दोन मुलांचाही समावेश आहे. शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी दुपारी 3:15 वाजता हा अपघात झाला. घरातून वरात निघणार होती, तेवढ्यात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Rajasthan
Madhya Pradesh: धक्कादायक! 55 फूट खोल बोअरवेलमध्ये 3 दिवसांपासून अडकून पडलाय 8 वर्षीय मुलगा

भुंगरा गावातील तख्त सिंह यांच्या घरी विवाह सोहळा होता. यावेळी हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले आहेत. डॉ. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दिलीप कछावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 60 जखमींपैकी 51 जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जण 90 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. वॉर्डमध्ये 48 जण दाखल आहेत, 1 मुलगा आयसीयूमध्ये आहे. तर, दोन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे.

Rajasthan
Goa Petrol-Diesel Price: एक वर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, जाणून घ्या गोव्यासह देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर

ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे मोठ्या संख्येने लोकांचा जमाव उपस्थित होता. जळालेल्या लोकांना शेरगड येथे आणण्यात आले आहे. येथील काही लोकांना जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये रेफर करण्यात आले आहे. ग्रामीण एसपी अनिल कायल यांनी सांगितले की, स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर लिक होऊन आग लागली. दरम्यान, जवळपासच्या पाच सिलिंडरलाही आग लागली आणि स्फोट झाले. सिलिंडरचा स्फोट झाला तिथे जवळपास 100 लोक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com