Maharashtra ISIS Module NIA Chargesheet Exposes: महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणाचा तपास करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने मोठा खुलासा केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दहशतवादी बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. यातच आता, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने ISIS च्या सहा दहशतवाद्यांविरोधात दाखल केलेल्या 4000 पानांच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती उघड केली आहे. एनआयएचे विशेष न्यायाधीश एके लाहोटी यांच्याकडे सादर केलेल्या आरोपपत्रात ताबीश सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला, शर्जील शेख, आकीफ नाचन, जुबेर शेख आणि डॉ अदनानली सरकार या अटक केलेल्या व्यक्तींची कुंडली दिली आहे. पुणे आणि ठाण्यात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ISIS मॉड्यूलवर NIA च्या कारवाईदरम्यान या सहाही जणांना पकडण्यात आले.
दरम्यान, 16 साक्षीदारांच्या जबाबावर आधारित आरोपपत्र अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या तांत्रिक कौशल्यावर प्रकाश टाकते. विशेष म्हणजे, त्यापैकी दोन जण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर होते. बडोदावालाने 31 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले, तर झुबेर शेखने वरिष्ठ सहयोगी म्हणून काम केले. शरजीलनेही मोठ्या आयटी कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम केले. हा खुलासा हिज्बु-उ-ताहरीर दहशतवादी प्रकरणात झालेल्या अटकेशी समांतर आहे, जिथे मध्य प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केलेल्या व्यक्तींची विविध व्यावसायिक पार्श्वभूमी होती, ज्यामधील काही जण जिम ट्रेनर, शिक्षक, ऑटो ड्रायव्हर, टेलर, संगणक तज्ञ होते.
एनआयएच्या आरोपपत्रानुसार, एजन्सीने सुरुवातीला ISIS मासिकाद्वारे ISIS ईमेल आयडी शोधला. यामध्ये ताबिशने 31 जुलै 2016 रोजी दहशतवादी गटाला ईमेल पाठवला होता. त्यानंतर या ईमेलला 25 फेब्रुवारी 2017 रोजी "चांगले काम, तुमचा संपर्क आणि पत्ता अपडेट करा, आम्ही संपर्कात राहू" असे उत्तर आले होते. 2015 ते 2017-18 दरम्यान, ताबीश आणि बडोदावाला यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. त्यानंतर, त्यांनी ISIS च्या खलिफाकडे एकनिष्ठतेची शपथ घेतली होती.
तसेच, NIA च्या आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे Tabish ने ISIS शी संबंधित असलेल्या ईमेल आयडीसह "do it yourself (DIY)" किटची PDF फाइल शेअर केली होती. ''ताबीशने टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या प्लॅटफॉर्मवर सह-आरोपी आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी संवाद साधण्यासाठी व्हर्च्युअल नंबर आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरला होता," असेही एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, ताबिशने टेलिग्राम अॅप आणि फेसबुक मेसेंजरद्वारे ISIS शी महत्त्वाची माहिती शेअर केली. फेब्रुवारी 2023 पासून तो त्याच्या ISIS हँडलर्सशी संवाद साधत होता, ज्यात “फॉर्म्युला वन” म्हणून ओळखल्या गेलेल्या व्यक्तीचा समावेश होता.
त्याचबरोबर, ISIS कडून चालवल्या जाणार्या मासिकात प्रकाशनासाठी माहिती आणि उर्दू भाषांतरे तयार करुन, प्रवास करुन ISIS मध्ये सामील होण्याचा ताबीशचा हेतू होता. “इस्तिशदी ऑपरेशन” नावाच्या सामग्रीच्या दुसर्या भागामध्ये आत्मघाती ऑपरेशन दर्शवण्याचा दावा करण्यात आला, त्याचे लक्ष्य प्रामुख्याने अतिसंवेदनशील मुस्लिम होते. शिवाय, अटक केलेल्या व्यक्तींकडून “व्हॉइस ऑफ हिंद” आणि “व्हॉईस ऑफ खोरासान” यासह दहशतवादी मासिके जप्त करण्यात आली आहेत.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी ISIS च्या समर्थनार्थ भारतभर दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखली होती. 2021-22 दरम्यान ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली येथे या उद्देशाने बैठकाही झाल्या होत्या.
एनआयएने म्हटले आहे की, “साक्षीदारांच्या जबाबावरुन हे स्पष्ट होते की आरोपी A-2, A-4, आणि A-6 (जुल्फिकार बडोदावाला, शरजील शेख आणि अकिफ नाचन) आणि इतर (शमिल नाचनसह, एनआयएच्या दुसर्या खटल्यातील आरोपी आहेत.) यांच्यात पडघा-बोरिवली येथे अनेक बैठका झाल्या होत्या. त्यांनी इस्लामिक स्टेट (ISIS) साठी निर्दोष मुस्लिम तरुणांची भरती करण्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे, Daesh (ISIS) च्या विचारसरणीचा प्रचार करुन आणि अल-शामच्या भूमीवर हिंसक जिहाद करुन इस्लामिक स्टेटच्या कारवायांना पुढे नेले.''
तसेच, भारतात दहशतवादी आणि हिंसक ISIS विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी समर्पित व्यक्तींचे एक नेटवर्क तपासात उघड झाले आहे. आरोपींचा उद्देश देशातील लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा होता. शिवाय, आरोपी तरुणांना आयईडी आणि लहान शस्त्रे तयार करण्यासाठी भरती आणि प्रशिक्षण देण्यात गुंतले होते.
दुसरीकडे, पुणे ISIS मॉड्युल प्रकरणातील महत्त्वपूर्ण घडामोडीत डॉ. अॅनेस्थेसियोलॉजिस्ट अदनान अली सरकार याला 27 जुलै 2023 रोजी अटक करण्यात आली. मुंबईतील ताबिश नासेर सिद्दीकी, झुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा यांच्या अटकेनंतर काही आठवड्यांनंतर पुण्यातील कोंढवा येथील त्याच्या निवासस्थानावर NIAने छापा टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली होती. अदनानच्या फ्लॅटमधून जप्त केलेल्या कागदपत्रांवरुन तरुणांची भरती करण्यात त्याचा सहभाग उघड झाला आणि आर्थिकदृष्ट्या वंचित व्यक्तींना दहशतवादी संघटनांशी जोडण्याबाबत तपशील देण्यात आला. याशिवाय, मुंबईतील ज्यू कम्युनिटी सेंटरचे फोटो चार आरोपींच्या ताब्यातून मिळाले, जे भारतातील ज्यूंनाही इस्लामिक स्टेटने लक्ष्य केले होते.
तसेच, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील लक्ष्यांपैकी एक असलेल्या कुलाब्यातील छाबरा हाऊसमध्ये मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी (आयएसआयएस मॉड्यूलचा भाग) ड्रोन वापरुन हवाई स्फोटांची योजना आखली होती आणि त्यांनी त्यांच्या भयंकर हेतूंचा भाग म्हणून मॉक बॉम्बस्फोट घडवून आणले. दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात राहून ड्रोनद्वारे हवाई स्फोट करण्याचे तंत्र शिकून बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्या होत्या. जुलै 2023 मध्ये, पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांच्यासह शाहनवाज याला सुरुवातीला पुण्यात दुचाकी चोरीसाठी अटक केली. मात्र, शाहनवाज पळून जाण्यात यशस्वी झाला, ज्यामुळे पुणे ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा व्यापक तपास सुरु झाला. पुण्यातील तल्हा लियाकत खान आणि दिल्लीतील रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फैयाज शेख या तीन वॉन्टेड दहशतवाद्यांची ओळख पटली होती.
तसेच, शाहनवाजला नंतर ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांनी पकडले होते, ज्याने उघड केले की त्याची पत्नी, बसंती पटेल हिंदू होती, मात्र नंतर तिने इस्लाम स्वीकारला आणि मरियम झाली. मरियम आणि तिच्या बहिणीचा शोध सुरु आहे. नागपूरच्या एनआयटीमधून मायनिंगमध्ये बीटेक करुन पदवीधर असलेल्या शाहनवाजचे बडोदावाला, पुणे ISIS दहशतवादी मॉड्यूलचा सूत्रधार आणि फायनान्सर याच्याशी संबंध होते. बडोदावालाने मोहम्मद इम्रान, युनूस आणि शाहनवाज यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवला होता. आयईडी तज्ज्ञ अकिफ अतिक नाचन याने इम्रान आणि युनूस यांना लपवले. मोहम्मद इम्रान, ग्राफिक डिझायनर, इम्रान आणि युनूसच्या कोंडवा फ्लॅटमध्ये राहिला होता, त्याने 2022 मध्ये अकिफकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. यातच, एजन्सी प्रशिक्षणात सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेत आहे.
दुसरीकडे, राजस्थानमधील चित्तौडगड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात एनआयएने इम्रानवर 5 लाखांचे बक्षीस ठेवले होते. इम्रान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानंतर सर्व आरोपींविरुद्ध UAPA गुन्हे दाखल करण्यात आले. ISIS विविध दहशतवादी गटांना एकत्र करुन भारतात व्यापक कारवाया कशा प्रकारे करत आहे, हे सर्वसमावेशक आरोपपत्र उघड करते. हे कट्टरतावादाच्या धोकादायक प्रवृत्तीच्या अनुषंगाने स्वयं-रॅडिकलाइज्ड व्यक्तींचे नेटवर्क देखील उघड करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.