Sugar Production  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sugar Production : साखरेच्या उत्पादनात यंदा महाराष्ट्र आघाडीवर, बघा आकडेवारी

गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन 187.1 लाख टन होते. यंदा त्यामध्ये 6 लाख टनांची वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sugar Production in Maharashtra: केंद्र सरकारने साखर (Sugar) उत्पादनाबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन 6 लाख टनांनी वाढलं आहे. यंदा साखरेचं उत्पादन 187 लाख टनांवरुन 193 लाख टन झालं आहे.

साखरेचे उत्पादन वाढले

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील साखरेचं उत्पादन अधिक वाढले आहे. याचा देशातील मोठ्या लोकसंख्येला आर्थिक फायदा होईल. इंडियन शुगर मिल असोसिएशनची आकडेवारी समोर आली आहे.

त्यांच्या मते, गेल्या 4 महिन्यांत साखरेचे उत्पादन 3.42 टक्क्यांनी वाढून 193.5 लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत साखरेचे उत्पादन 187.1 लाख टन होते. यंदा त्यामध्ये 6 लाख टनांची वाढ झाली आहे.

साखर उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर-जानेवारीमध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 72.9 लाख टन होते, ते यंदा 73.08 लाख टन झाले आहे.

520 कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं

यावर्षी 31 जानेवारीपर्यंत 520 साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. इथेनॉल निर्मितीसाठी पाठवलेला मोलॅसेस एकूण साखर उत्पादनापेक्षा वेगळा असतो. गेल्या वर्षी ते 187.1 लाख टन होते. मात्र, भारत सरकार इथेनॉल निर्मितीवर अधिक भर देत असल्याचा कयास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

छ. संभाजी महाराजांनी जुवे किल्ला ताब्यात घेतला, पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडाली; मराठी सैन्य साळ नदीकाठी ठाण मांडून बसले

Morjim News: मोरजी किनारपट्टीवर भटक्या गुरांचा धुमाकूळ; वाहतुकीत अडथळा, पर्यटकांना त्रास

कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! 'मत्स्यगंधा एक्सप्रेस'मधून 50 लाखांचं सोनं, 34 हजारांची रोकड जप्त! हरियाणातील 4 जण अटकेत

Pooja Naik: 'माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पालेकरांकडे फक्त मदतीसाठी गेले', पूजा नाईकचे राजकीय संबंधांवर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT