Maharashtra Home Minister Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

नवाब मलिक यांना मोठा धक्का, SC ने फेटाळली याचिका

महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री नवाब मलिक यांची तात्काळ सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मलिकांची याचिका फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, ''या टप्प्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ते जामिनासाठी अर्ज दाखल करु शकतात.' न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'तपासाच्या या टप्प्यावर आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही.'

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्या आदेशात म्हटले आहे की, ''उच्च न्यायालयाचे निरीक्षण केवळ अंतरिम दिलासा द्यायचा की नाही यापुरते मर्यादित आहे. कायद्यात उपलब्ध असलेल्या उपायांचा अवलंब करण्यात आम्ही आडकाठी आणणार नाही.''

तसेच, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या वतीने कपिल सिब्बल म्हणाले की, ''2022 मध्ये त्यांना ज्या प्रकरणात अटक करण्यात आली, ते प्रकरण 1999 चे आहे? 5 हजार पानांच्या आरोपपत्रामुळे विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. प्रथमदर्शनी माझ्यावर कोणताही खटला दाखल झालेला नाही. त्यामुळे हे पीएमएलए प्रकरण बनत नाही.''

वास्तविक, नवाब मलिक यांनी याचिका फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात मलिकांनी तात्काळ सुटकेची मागणी केली होती. मलिकांनी आपली अटक बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयात यापूर्वी याचिका दाखल केली होती. ईडीकडून करण्यात कारवाई रद्द करुन आपली तात्काळ सुटका करण्याची मागणी मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. तर दुसरीकडे, उच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) त्यांना कोठडीत पाठवण्याचा विशेष न्यायालयाचा आदेश बेकायदेशीर किंवा चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही कारण तो त्यांच्या बाजूने नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

याशिवाय, मुंबईतील (Mumbai) कुर्लामध्ये असलेल्या मुनिरा प्लंबरची 300 कोटींची जमीन मलिकांनी 30 लाख रुपयांना विकत घेतली होती. विशेष म्हणजे त्यात 20 लाख रुपयांचे पेमेंटही करण्यात आले होते. या जमिनीच्या मालकाला मलिकांनी एक रुपयाही दिला नाही, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आल आहेत. तर दुसरीकडे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या नावे पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीद्वारे ही जमीन त्यांना देण्यात आली होती. त्यानंतर ही जमीन नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्या नावावर झाली. त्या बदल्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या खात्यात पन्नास लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

SCROLL FOR NEXT