Classroom  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स

नवीन शैक्षणिक वर्षात ब्रिज कोर्स पूर्ण झाल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम शिकवला जाईल.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या काळात मुलांच्या अभ्यासाचे नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जूनमध्ये शाळा पुन्हा सुरू होताच ब्रिज कोर्स अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एक मॉडल तयार केले आहे. (Maharashtra government to start bridge course for students)

नवीन शैक्षणिक वर्षात ब्रिज कोर्स पूर्ण झाल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम शिकवला जाईल. मागील इयत्तांमध्ये शिकवलेले विद्यार्थ्यांना किती समजले आहे, याचा अंदाज घेणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र शिक्षण विभागाने म्हटले आहे. ब्रिज कोर्स सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल आणि शिक्षकांना ब्रिज कोर्स शिकवण्यासाठी पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.

शिक्षकांसाठी हेल्पलाइन सेवा करणार सुरू

शिक्षण आयुक्त सूरज मांधरे यांनी सांगितले की, ही अत्यंत असामान्य परिस्थिती आहे. एक साचा सर्व सुधारात्मक उपायांसाठी बसू शकत नाही. मूल्यमापन मॉड्युल तयार केले असले तरी ते प्रत्येकासाठी वेगळे असेल आणि त्यामुळे उपचारात्मक अध्यापन वैयक्तिक विद्यार्थीभिमुख असावे. हे लक्षात घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्यूल दिले जाईल. शिक्षकांसाठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्याचाही विचार शिक्षण विभाग करत असल्याचे मांडरे यांनी सांगितले.

हे मॉड्यूल राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केले आहे. ब्रिज कोर्सनंतरच उच्च वर्गाचा नवीन अभ्यासक्रम सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT