Farmers

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

Farmers Suicide: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच!

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्य सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी महाराष्ट्र विधानसभेत सांगितले की, गेल्या पाच महिन्यांत राज्यात एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी (Farmers) आत्महत्या केल्या आहेत. वडेट्टीवार हे महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत. सभागृहाला लेखी माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यात पाच महिन्यांत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

दरम्यान, त्यांनी सांगितले की शेतकरी आत्महत्यांचा हा आकडा जून 2021 ते ऑक्टोबर 2021 पर्यंतचा असून आकडेवारीनुसार दररोज 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वडेट्टीवार पुढे म्हणाले, या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 491 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या संबंधित समित्यांनी पात्र घोषित केले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक समस्या हे आत्महत्येचे कारण ठरले

महाराष्ट्र सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे प्रचंड कर्जाचा बोजा आणि त्यांची परतफेड करण्याची असमर्थता. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, कौटुंबिक व वैयक्तिक समस्यांमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट होऊन त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

2019 मध्ये दर 3 तासाला 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातले

केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी (narendra modi) सरकारने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते की, भारतात 2019 या वर्षात 5,957 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 2018 मध्ये हा आकडा 5,763 होता. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये सांगितले की, 2019 मध्ये दर तीन तासांनी सरासरी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

या आकडेवारीनुसार देशातील 45 टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातल्या आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्रात 2,680 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT