RT-PCR Test केली नाही म्हणून विधानभवनात कदमांना नो एट्री

कदम हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, असं असतानाही त्यांना गेटवरच अडवल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात होते. तसेच या घटनेचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.
Ramdas Kadam

Ramdas Kadam

Dainik Gomantak

Published on
Updated on

शिवसेनेच्या बड्या नेत्यांवरच थेट हल्लाबोल करणारे शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम (Ramdas Kadam) आज विधानभवनात आले होते. त्यांना विधानभवनात जाण्यापासून रोखण्यात आले. आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने कदम यांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आले. मात्र, कदम हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, असं असतानाही त्यांना गेटवरच अडवल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात होते. तसेच या घटनेचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.

Ramdas Kadam

मुख्यमंत्री प्रमोद सावतांना निवडून आणण्याची जबाबदारी मावळच्या बाळा भेगडेंवर

रामदास कदम आज दुपारी विधानभवनात (Vidhan Bhavan) आले होते. काही कामानिमित्ताने ते विधानभवनात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यांना विधानभवनाच्या गेटवरच अडवण्यात आलं. आरटीपीसीआर चाचणी केली का अशी विचारणा कदम यांना करण्यात आली. कदम यांनी नाही असे उत्तर दिल्याने त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करून येत नाही तोपर्यंत आतमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यावेळी कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला.

तरीही त्यांना आतमध्ये जाऊ दिलं गेलं नाही. त्यानंतर कदम हे बराच वेळ विधानभवनाच्या बाहेर उभे होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. याचवेळी त्यांनी काही ठिकाणी फोनाफोनीही केली. त्यानंतर त्यांना आत सोडण्यात आले. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांवर खासकरून परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरती टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता विधानसभेत आलेल्या कदम यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ramdas Kadam

Maharashtra: महिलांवरील अत्याचाराला 'शक्ती' विधेयक घालणार आळा!

रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद (Press conference) घेऊन अनिल परब यांच्यावर टीका केली होती. गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर परब हे शिवसेनेच्या मुळावर उतरले आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असं ते म्हणाले होते.

यावेळी त्यांनी परब यांच्या निवडणुकीतील सेटलमेंटवरही टीका केली होती. परब यांनी मिटिंग बोलावली या मिटिंगला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) उपस्थित होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवींनी संजय कदम यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. त्यानंतर परब यांनी आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतले.

Ramdas Kadam

Opening Ceremony केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आज धुळे दौऱ्यावर

आता सामंत यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं. राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनाला (Shiv Sena) 5 जागा भटल्या पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. मग परब निष्ठावंत कसे? त्यांनी संपूर्ण पक्ष राष्ट्रवादीला आंदण देण्याचं काम सुरू केलं आहे, असा दावाही त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com