Egg Shortage In Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

Egg Shortage In Maharashtra: महाराष्ट्रावर 'अंडी' संकट, दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा

सध्याच्या घडीला औरंगाबादमध्ये 100 अंड्यांची किंमत 575 रुपये एवढी झाली आहे.

Pramod Yadav

Egg Shortage In Maharashtra: महाराष्ट्रात सध्या दिवसाला तब्बल एक कोटी अंड्यांचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने अंडी उत्पादन वाढविण्यासाठीच्या सुविधा सध्या बंद केल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे.

पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला दिवासाला 2.25 कोटी अंडी खाल्ली जातात. यापैकी तब्बल एक कोटी अंड्यांचा तुटवडा राज्याला भासत आहे.

राज्यात दररोज 1 ते 1.25 कोटी अंडी उत्पादित करण्याची क्षमता आहे पण, सरकारने अंडी उत्पदानाची सुविधा रोखल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. राज्यातील तुटवडा भरून काढण्यासाठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंड्यांची आयात केली जात आहे.

"अंडी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला 21,000 रुपयांच्या अनुदानित दराने 50 पांढऱ्या लेघॉर्न कोंबड्या आणि 1,000 पिंजरे देण्याची योजना आखत आहे," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विभागाने पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अंड्यांचे दर वाढले आहेत. सध्याच्या घडीला औरंगाबादमध्ये 100 अंड्यांची किंमत 575 रुपये एवढी झाली आहे. मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी ही किंमत 500 रुपयांच्या (100 अंडी) वर आहे," असे येथील विक्रत्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील चिकन, मटण दुकाने ‘प्रदूषण नियंत्रण’च्या रडारवर! पाळावे लागणार कठोर निकष; नियमित तपासणी, अहवाल सादर करणे बंधनकारक

Sand Mining: 'रेती परवाने का अडकलेत'? धक्कादायक माहिती उघड; पर्यावरण दाखल्यातील अटीचाही घोळ

Goa Rain: ऑक्टोबरमध्ये 'रेकॉर्डब्रेक' पाऊस! 121% जास्त कोसळला; अजूनही तुरळक सरींची शक्यता

Goa Politics: मंत्रिमंडळातील 'रिक्त जागी' मुख्‍यमंत्री कुणाची वर्णी लावणार? गूढ वाढले; आमदार मायकल, संकल्‍प यांना महामंडळे

Indira Gandhi: मारुती प्रकरणात तुरुंगवास, अवघ्या 33 महिन्यांत केलं जबरदस्त कमबॅक, जनता पक्षाला सूड पडला भारी; इंदिरा गांधींची 'ती' अविस्मरणीय लढाई

SCROLL FOR NEXT