Jamtara Connection with Maharashtra Electricity Bill Scam Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील वीजबिल स्कॅमचं 'जामतारा कनेक्शन'

तुम्हाला सुद्धा वीजबिलाचा बनावट SMS येतोय? हे आहे जामतारा कनेक्शन

Priyanka Deshmukh

मुंबई : हल्ली सगळ्यांकडे मोबाइल आहे. अशातच सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मोबाइल पेमेंट्समुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई पुणे शहरातील बनावट वीज एसएमएस प्रकरणांची सध्या जोरदार चर्चा आहे. मलबार हिल पोलिसांनी बुधवारी नवी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 37 वर्षीय वेटरला बनावट एसएमएस प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, या आरोपीचे झारखंड कनेक्शन असल्याचे तपासातून समोर आले आहे. या आरोपीने नेपियन सी रोड रहिवाशाच्या दोन क्रेडिट कार्डमधून 1.7 लाख रुपये पळवले होते. (Jamtara online scam)

बिल न भरल्यास आपला वीजपुरवठा खंडित होणार

या प्रकारचे एसएमएस अधिकृत क्रमांकावरून कधीच येत नाही हे ग्राहकांना माहिती असणे गरजेचे आहे. कारण या सायबर गुन्हेगारांनी अनेकांना लुटले आहे. तेव्हा आता ग्राहकांना जागृत होणे गरजेचं झालं आहे. अनोळखी नंबरवरून फोन किंवा एसएमएस आल्याच पडताळणी केल्याशिवाय आपली माहिती देणे शक्यतोवर टाळलेलं बरं असतं. सध्या मुंबई पुण्यातून हेच प्रकरणं पुढे येत आहे. 'बिल न भरल्यास आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येईल,' असे या संदेशात म्हटले जाते आहे.आणि ग्राहत घाबरून या सायबर सापळ्यात अडकत आहेत.दरम्यान, सावेला नवी मुंबई येथून घरी परतत असताना या वेटरला पोलिसांनी पकडले. 'विद्युत अधिकारी' आहे असे सांगत ग्राहकांना लुबाडणारा हा माणूस जामतारा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा आरोपी मूळचा झारखंडचा असून कोपरखैरणे येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस पुढील तपास करत आहे. (Maharashtra Electricity Bill Scam)

झारखंडमधील जामतारा जिल्ह्याची जोरदार चर्चा (Jharkhand Jamtara News)

अशा प्रकरणाची माहिती घेतली असता, झारखंडमधील जामतारा जिल्ह्याची जोरदार चर्चा आहे. नुकतीच नेटफ्लिक्सवर जामतारा वर आधारित एक वेब सिरीज रिलीज झाली आहे. इथे असे काय आहे, की हा जिल्हा इतका बदनाम झाला आहे? देशातील 22 राज्यांच्या पोलिसांना येथे छापा टाकण्यासाठी का यावे लागले? अचानक असे काय झाले की ज्या तरुणांना सायकल चालवणेही नशिबात नव्हते ते महागड्या एसयूव्ही आणि स्पोर्ट्स बाइकवरून फिरू लागले. लाल कार्ड (रेशनकार्ड) साठी हपापलेल्या या लोकांचे खिसे एटीएम कार्डाने कसे फुटू लागलेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी पोलिसांना येथे छापे टाकावे लागले.

हेच कर्मतांड सायबर क्राईमचा अड्डा

जामताऱ्यापासून 17 किमी अंतरावर कर्मतांड आहे. एकेकाळी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे हे कार्यस्थळ होते, आज हेच कर्मतांड सायबर क्राईमचा अड्डा झाले आहे. येथील अत्यल्प शिक्षित तरुणांनी बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकारणी, आणि श्रीमंत लोकांची बँक खाती अगदी मोबाईलचा वापर करून फोडली आहेत.

अशाप्रकारे येथील बेरोजगार तरुणांनी संपूर्ण देश केला उद्ध्वस्त

याची सुरुवात सरगना सीताराम मंडळापासून झाली. जामतारा पोलिसांच्या फाईल्समध्ये असलेल्या माहितीनुसार- दहा वर्षांपूर्वी येथील सिंदरजोरी या गावात राहणारा सीताराम मुंबईला गेला होता. येथील एका मोबाईल रिचार्जच्या दुकानात त्याला नोकरी मिळाली. आणि इथेच तो लोकांना फसवायला शिकला. सुटीच्या दिवशी परत आल्यावर त्याने फसवणुकीची ही युक्ती आपल्या गावात पण वापरून पाहिली. बनावट सिमकार्डचा आव आणून तो बनावट बँक व्यवस्थापक बनून ग्राहकांना फोन करायचा. 'तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे', असे म्हणत त्याने एटीएम क्रमांक, ओटीपी आणि सीव्हीव्ही क्रमांक अशी माहिती मागितली होती. फोन कट होईपर्यंत ग्राहकांचे बॅंक अकाउंटही रिकामे झाले असायचे.

एकाच ठिकाणाहून देशभर फसवणुकीचा खेळ

त्यानतंर हे पैसे तो मोबाईल रिचार्ज रिटेलरच्या आयडीवर ट्रान्सफर करायचा. त्यापैकी 30 टक्के तो आपल्यासाठी ठेवायचा, बाकी किरकोळ विक्रेता त्याला उर्वरित 70 टक्के रोख रक्कम देत होता. सीतारामने कमिशनचे आमिष दाखवून अनेकांची बँक खाती व चेकबुक रिकामे केले. फसवणूक करून मिळवलेली रक्कम तो याच खात्यांमध्ये ट्रांन्सफर करायचा. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर सीताराम पकडला गेला. त्याला दीड वर्षाची शिक्षा झाली. दुसऱ्या प्रकरणातही पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र या दरम्यान सीतारामच्या शिष्यांनी गावात अशा अनेक टोळ्या तयार केल्या असून, ते सगळे एका ठिकाणी बसूनच देशभर फसवणुकीचा खेळ खेळत आहेत.

दोन वर्षांत 156 गुन्हे, 220 अटक

आम्ही बँका आणि ईडीसोबत काम करत आहोत असे त्यांनी सांगतिले. येथे पाचशेहून अधिक सायबर ठग पकडले गेले आहेत. मात्र, अद्याप फक्त सात जणांना शिक्षा झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अशा दोन डझनहून अधिक गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. या कारवाईत गुंडांची आलिशान घरे जप्त करण्यात येणार आहे, असे जामतारा एसपी अंशुमन कुमार यांनी पोलिसांची चूक मान्य करत सांगितले.

फसवणूक बळी नेता-अभिनेताही

वर्षभरापूर्वी दिल्ली पोलिसांनी सीतारामला अटक केली होती. सीतारामने एका मोठ्या अभिनेत्याच्या खात्यातून 5 लाख रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते. अद्याप या अभिनेत्याचे नाव पुढे आले नाही.

जामतारा येथील अताउल अन्सारी याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांची 23 लाख रुपयांची फसवणूक केली होती. बँक मॅनेजर असल्याचं भासवत त्याने प्रनीत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता.

या टोळीने केरळच्या खासदाराची 1.60 लाख रुपयांची फसवणूक केली. संसद भवन दिल्ली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्या प्रकरणी येथून धनंजय आणि पप्पू मंडल यांनाही अटक करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT