Devendra Fadnavis & Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

PM मोदींच्या वाटेवर एकनाथ शिंदे, महाराष्ट्रात 75000 सरकारी नोकऱ्यांची घोषणा

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारने येत्या एक वर्षात राज्यातील तरुणांना 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारने येत्या एक वर्षात राज्यातील तरुणांना 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वर्षभरात 75 हजार सरकारी नोकऱ्या देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली आहे. तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराचेही फडणवीस यांनी कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, 'पंतप्रधानांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारनेही नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. 75,000 नोकऱ्यांपैकी 18,000 जागा पोलीस खात्यात असतील. येत्या 5 ते 7 दिवसांत यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.'

दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याची चर्चा

जूनमध्ये पंतप्रधानांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात 'मिशन मोड'वर 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यास सांगितले होते. दुसरीकडे, मोदींनी शनिवारी 75,000 सरकारी नोकरीच्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली. पंतप्रधान म्हणाले की, 'युवकांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र अनेक आघाड्यांवर काम करत आहे.'

पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'आज भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) आहे. 7-8 वर्षात आम्ही 10 व्या क्रमांकावरुन 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हे शक्य होत आहे, कारण गेल्या 8 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते, त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत. स्टार्टअप इंडिया मोहिमेने देशातील तरुणांची क्षमता जगभरात प्रस्थापित केली आहे. 2014 पर्यंत देशात काही मोजकेच 100 स्टार्टअप होते, आज ही संख्या 80,000 पेक्षा जास्त झाली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT