Nagpur Goa Shaktipeeth Expressway:  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nagpur Goa Expressway: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य; जाणून घ्या काय म्हणाले...

परभणीतील शासन तुमच्या दारी कार्यक्रमात घोषणा

Akshay Nirmale

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी मोठी घोषणा केली. परभणी येथे झालेल्या शासन तुमच्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.

हा महामार्ग मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचे भाग्य बदलणारा असेल, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात समृद्धी महामार्गामुळे एक मोठे परिवर्तन घडताना दिसत आहे. नांदेड, परभणी हे समृद्धी महामार्गाला जोडण्याबाबत या सरकारने गती दिली आहे. भूसंपादनासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी दिला.

हे काम झाल्यानंतर परभणी जिल्ह्याचे चित्र आपल्याला बदललेले दिसेल. आणि आता एवढंच नाही, तर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग आपण करत आहोत.

फडणवीस म्हणाले, हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असला तरी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणारा हा महामार्ग असणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग येण्यासाठी, बाजारपेठ विकसित होण्यासाठी मराठवाड्याला या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर अतिषय हिताचे निर्णय घेतले आहेत.

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांसाठी निधी दिला आहे. परभणी शहरातले रस्ते खराब झाले आहेत. पण काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर दूर उतरवले.

येत्या काळात परभणीचे चित्र बदललेले दिसेल. येथील रस्ते काँक्रिटचेच करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

760 किलोमीटरचा मार्ग

हा एक्सप्रेसवे राज्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रांना जोडेल. यामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 10 तासांनी कमी होईल. सुमारे 760 किमी लांबीच्या या एक्सप्रेसवेची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेपेक्षा जास्त असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुढचे 5 दिवस पावसाचे! राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी; तीव्रता वाढण्याची शक्यता

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Live News: 5 दिवस पाऊस राहणार कायम

SCROLL FOR NEXT