Corona Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत बुधवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 739 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबईत (Mumbai) बुधवारी कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गाची 739 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी 4 फेब्रुवारीनंतर एका दिवसात नोंदवलेली सर्वाधिक रुग्न संख्या आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे मृत्यूची एकही नवीन घटना नोंदलेली गेलेली नाही. शहरात सध्या 2 हजार 970 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. (Maharashtra Corona Update Increase in corona patients)

मुंबईत आतापर्यंत एकूण 10,66,541 संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आणि 19,566 रुग्णांचा मृत्यू झाला. 4 फेब्रुवारी रोजी मुंबईत संसर्गाची 846 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान, बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की धारावी झोपडपट्टी वसाहतीमध्ये बुधवारी संसर्गाची 10 नवीन प्रकरणे नोंदवली आहेत, ही चिंताजनक बाब आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मान्सूनच्या दारात लक्षणे आढळून येण्याबाबत सावधगिरी बाळगली आणि सर्व नागरी विभागांना जंबो हॉस्पिटल्स, वॉर्डनिहाय खोल्या तयार करून, चाचणीचा वेग वाढवून आणि पौगंडावस्थेतील लसीकरण व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे.

बुधवारी 739 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यात 117 दिवसांतील सर्वोच्च, शहराचा मुख्य दैनंदिन सकारात्मकता दर 8.4% वरती पोहोचला आहे. सकारात्मकता दरामध्ये तीन महिन्यांत पाहिलेली ही सर्वात तीव्र उडी असल्याचे सांगण्यात आले, जी सध्या 0.5% पेक्षा कमीवर गेली आहे. महाराष्ट्रातील 1,081 प्रकरणांमध्ये मुंबईतील रुग्नांचा मोठा वाटा आहे. 24 फेब्रुवारीपासून एका दिवसात सर्वाधिक 1,182 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वातून एकाही मृत्यूची बातमी नाही ही त्यामध्ये दिलासादायक बाब आहे.

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, या तेजीमागे अनेक घटक आढळून येऊ शकतात. त्यावेळी ते म्हणाले की सामान्य आर्थिक क्रियाकलापांमध्ये लोकांचा अधिक संवाद, कोविड-योग्य वर्तनातील हलगर्जीपणा आणि मास्क न घालणे ही काही कारणे आहेत. ओमिक्रॉन प्रकार BA.4 आणि BA.5 ला देखील यासाठी जबाबदार धरले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत BA.4 आणि BA.5 Omicron प्रकारांची आत्तापर्यंत सात प्रकरणे आढळून आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT