महाराष्ट्रात कोरोना वाढ; दिवसभरात नवे 1781 रुग्ण

राज्यात आज एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
Covid - 19
Covid - 19 Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही महिन्यात कोरोनाने संपुर्ण देशभरात कहर केला होता. याबरोबरच महाराष्ट्रात ही कोरोनाने नागरीजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर मात्र कोरोना संक्रमण कमी झाल्यामूळे अर्थव्यवस्था आणि नागरीजीवन पुर्वपदावर येत आहे. असे असताना पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. कारण महाराष्ट्रात काल कोरोनाबाधितांची संख्या ही 711 होती. ती आज 1781 वर पोहोचली आहे. त्यामूळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ( Growth of corona in Maharashtra; 1781 new patients during the day )

Covid - 19
मुंबईत कोरोनाचा कहर, 4 महिन्यांत आढळले सर्वाधिक रुग्ण

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,88,167 एवढी झालेली आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण 4 हजार 32 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2 हजार 970 रुग्ण हे मुंबईतील आहेत. याशिवाय आज दिवसभरात राज्यात 524 रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 77,36,275 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,09,51,360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,88,167 (09.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

भारतात नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील कोविड रिकव्हरी 4,26,09,335 वर पोहोचला असून गेल्या 24 तासात 2,158 रुग्न बरे झाले आहेत. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 193.13 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 4,47,637 चाचण्या देखील घेण्यात आल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. देशव्यापी COVID-19 लसीकरण 16 जानेवारी, 2021 रोजी सुरू झाले आणि COVID-19 लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून, 2021 रोजी सुरू झाला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे, तर त्यांना कोविड लस देखील मोफत देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com