चंद्रकांत पाटील  Dainik Gomantak
महाराष्ट्र

तुमची मदत तुम्ही करा; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला

राज्य सरकारने (State Government) राज्यातील शेतकऱ्यांसाठी (farmers) मदत केली पाहिजे, असे केंद्राने स्पष्ट केले होते.

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर: NDRF ची मदत केवळ 1400 रुपये एवढी जमा झाल्याने भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना शेतकऱ्यांचे फोन, मेसेज येत आहेत. ठाकरे सरकार यावर सकारात्मक भूमिका घेणार की नाही याची शंका आहे. तसेच ठाकरे सरकार मदत करायची असेल तर केंद्राकडे बोट दाखवते. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वत: काहीही भूमिका घेत नाही. असे चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आज मला शेतकऱ्यांचे सकाळपासून फोन येत आहेत. फक्त 1400 रुपये जमा झाले आहेत. असे कोल्हापुरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

तसेच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्राची वाट न पाहता 9600 कोटी दिले होते. आणि केंद्राने देखील 1800 कोटींची मदत दिली होती. एनडीआरएफची ही मदत सर्व देशसााठीची होती. केंद्राची ही मदत प्रातिनिधीक आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत केली पाहिजे, असे केंद्राने स्पष्ट केले होते, असे केंद्राने स्पष्ट केले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी 9600 कोटीचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु त्या पैकी 1800 कोटी मिळाले होते. बाकीचे आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीतून शेतकऱ्याना मदत दिली होती. परंतु ठरले सरकार केंद्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना निव्व्ल 1400 रुपये दिले.

दरम्यान, पुढे बोलताना पाटील म्हणाले, सिन्नरमधून शेतकऱ्यांचे फोन आले होते. तेथेही 1400 रुपये मिळाले असे या शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्याची अडीच हेक्टर जमीन आहे. सर्वच शेतकऱ्यांना याच रेंजमध्ये पैसे मिळाले आहेत. या सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा शक्ती नाही. जवळपास 15 दिवस पीकं पाण्याखाली आहे आणि यांनी पंचनामे कसे केले. देवेंद्र फडणवीसांनी पंचनामे न करताच निधी दिला होता, असंही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT