Chhatrapati Shivaji Maharaj Dainik gomantak
महाराष्ट्र

शिवराज्यभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून होणार साजरा

दुर्गराज रायगडवर संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

दैनिक गोमन्तक

रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. 6 जून 1674 रोजी झाला. या दिवशी ते छत्रपती असे बिरुद धारण करून साम्राज्याचे अधिपती झाले. ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कटालणी देणारी घटना होती. या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेकदिन विविध उपक्रम किल्ले रायगडावर साजरे केले जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात यापुढे 6 जून हा दिवस "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य ग्रामविकास विभागाने स्पष्ट केली आहे. (Shivrajyabhishek Din will be celebrated as Shivswarajya Din )

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात यापूढे 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकिय कार्यालयात सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येणार आहे. त्यामूळे सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ही राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिनाकडे पहावे लागते. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी म्हणून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2022 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

संभाजी राजे छत्रपती यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, दुर्गराज रायगडवर संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी गडावर आता अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, याच बरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या दिवशी गडावर येणाऱ्या शिवभक्तांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. तर गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र, उभारण्यात आले असल्याची माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT