maharashtra boat capsizes near malvan in sindhudurg many people died rescue operation underway Dainik Gomantak
महाराष्ट्र

सिंधुदुर्गातील मालवणजवळ समुद्रात बोट उलटली ; अनेकांचा मृत्यू ,बचावकार्य सुरू

पर्यटक बोट 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना बुडाली

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी एक पर्यटक बोट 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना बुडाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सहा पर्यटकांना मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बोटीतील इतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. जय गजानन असे या बोटीचे नाव आहे.(maharashtra boat capsizes near malvan in sindhudurg many people died rescue operation underway)

या अपघाताची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने बोट चालक व मालकावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या बोटीची प्रवासी क्षमता किती होती, सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आली होती का, याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या अपघातात निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेले पर्यटक हे मुंबई आणि पुण्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत 15 ते 20 लोक होते. 12.30 च्या सुमारास समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्या. या लाटांपासून सुटण्याच्या प्रयत्नात बोट लाटांचा तडाखा बसली आणि ती एका बाजूला उलटली. बोट दोन ते तीन वेळा उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लाटा बोटीला ढकलत होत्या. त्याचबरोबर अनेकांच्या नाका-तोंडाला पाणी आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT