Maharashtra: ban self test covid kit says mayor kishori pednekar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

COVID-19: सेल्फ कीटच्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोरोना सेल्फ किटची सोय उपलब्ध झाल्याने अनेक रुग्ण कोरोना (Corona)चाचणीसाठी लॅबमध्ये जाणे टाळत असल्याने आरोग्यासाठी (Health) धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा (Corona) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे मुंबई (Mumbai) प्रशासनासमोर नवी समस्या समोर उभी राहिली आहे. अनेक नागरिक सेल्फ किटचा (Self Kit) वापर करून घरीच कोरोना चाचणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लोकांना कोरोना झाला असला तरी त्याची नोंद होत नाही.असे लोक घरीच स्वतःवर उपचार करत आहेत. यामुळेच मुंबई महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात सेल्फ किट वापरण्यावर बंदी घातली जाऊ शकते अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी दिली.

कोरोना सेल्फ किटचा वापर करत असल्याने शहरातील कोरोनाबाधितांचा खरा आकडा नोंदला नाही. यामुळे मुंबई महापौरांनी नागरिकांना सेल्फ किटचा वापर न करता लॅबमध्ये जाऊन चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचे किट वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे नाही, मी कालचा सेल्फ किटवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव विचारपूर्वक केल्याचे किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली.

सलून 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी दिली असून ब्युटी पार्लरला बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाची बाजू घेत आपले मत सांगितले कि सलूनमध्ये केस कापताना ग्राहकाचा आणि केस कापणाऱ्यांचा खूप जवळून संबंध येत नाही. तर ब्युटी पार्लरमध्ये ग्राहक आणि ब्युटीशियनचा जास्त संपर्क येतो. यामुळे कोरोनाचा (Corona) संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे. सध्या परिस्थिती लक्षात घेता कोरोनावर नियंत्रण ठेवून रोजचे व्यवहार पुन्हा सुरु करणे अधिक फायदेशीर असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT