Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nana Patole Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात 'मविआ'ची नवी खेळी, उपमुख्यमंत्री पदासाठी मुस्लिम चेहरा देणार?

Maha vikas Aghadi: महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाबाबत पोलिसांची कारवाई तीव्र झाली आहे.

Manish Jadhav

Maharashtra News: महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाबाबत पोलिसांची कारवाई तीव्र झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून सरकारबाबत मोठे दावे केले जात आहेत.

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतील जातीय समीकरण, धार्मिक ध्रुवीकरण आणि मतदानाची पद्धत लक्षात घेऊन धोरणे आखण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम चेहऱ्याला उपमुख्यमंत्री करुन ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा उठवण्याची रणनीती यावेळी महाविकास आघाडी आखू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील जातीय समीकरण, धार्मिक ध्रुवीकरण आणि मतदानाची पद्धत लक्षात घेऊन महाविकास आघाडीनेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

भविष्यात मुस्लिम व्होट बॅंकसाठी महाविकास आघाडीने मुस्लिम उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय जवळपास घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले.

लाखोंच्या आघाडीवर असलेल्या महायुतीला मुस्लिम बहुसंख्य मतदारांनी विरोधात मतदान केल्याने एका विधानसभा सीट गमवावी लागली. धुळे, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई अशा अनेक ठिकाणी या पॅटर्नची पुनरावृत्ती झाली.

राजकीय तज्ञांच्या मते, मुस्लिम मतदार भाजपला कधीच मत देत नाही. लोकसभा निवडणुकीतही हे स्पष्टपणे दिसून आले. नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीतही हाच कल कायम राहिला. गेल्या विधानसभा निवडणुकांवर नजर टाकली तर मुस्लिम मतदारांनी थेट महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले.

आपले खरे मतदार एमआयएम किंवा वंचित बहुजन आघाडीकडे जाऊ नयेत यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी, उद्धव ठाकरेंनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला कडाडून विरोध केला. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे हेच धोरण कायम ठेवणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, ध्रुवीकरणाचे राजकारण संपणार नाही हे स्पष्ट आहे. हा ट्रेंड प्रत्येक निवडणुकीत कायम राहील. मात्र, काँग्रेस (Congress) सातत्याने कमकुवत होत आहे. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, "काँग्रेस नवीन मुस्लिम लीग बनली आहे. हिंदूंना काँग्रेसमध्ये भविष्य नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

Nuvem: नुवे भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे पंप वितरित, माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांचा उपक्रम : भाजी लागवडीसाठी प्रोत्साहन

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT