रासायनिक कारखान्याला लागलेली आग  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra:पालघरमधील रासायनिक कारखान्याला लागली भीषण आग

सतत असे अपघात घडत असताना कामगारांचे (Workers)नाहक बळी जात असून काही कामगारांना अपंगत्व ही येत आहे.

दैनिक गोमन्तक

पालघर: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर (Boisar)तारापूर येथील औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर 9/5 मधील रंग रसायन कंपनीला भीषण आग लागली होती.पालघर आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. आणि आग विझवण्यास सुरुवात केली.

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi)सुट्टीमुळे कारखाना बंद होता आणि आग लागली तेव्हा एकही कामगार आत नव्हता.त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी लगेचच पोलीस आणि अग्निशमन दल (Fire brigade)आले.सुदैवाची बाबा म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आणि कूलिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

या औद्योगिक क्षेत्रात (Industrial area)सातत्याने असे मोठ्या घटना घडत असून, सेफ्टी डिपार्टमेंट आणि संबंधित नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे वास्तव समोर येत आहे. सतत असे अपघात घडत असताना कामगारांचे नाहक बळी जात असून काही कामगारांना अपंगत्व ही येत आहे. याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन असे प्रकार आटोक्यात आणावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT