Sinhagad Express Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sinhagad Express: मदरसा शिक्षकाने धावत्या ट्रेनमध्ये काढली अल्पवयीन मुलीची छेड, सिंहगड एक्स्प्रेसमधील घटना

घटना घडली त्यावेळी रेल्वे त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याने हे प्रकरण कर्जत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pramod Yadav

धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बिहारमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा मदरशात शिक्षक आहे. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका मदरसा शिक्षकाने एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती मिळताच आरोपी मदरसा शिक्षकाला गुरुवारी पोलिसांनी अटक केली.

कल्याण रेल्वे पोलिसांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्याहून मुंबईकडे सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करत होती. दरम्यान, बिहारच्या सीतामढी येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय आरोपीने कथितरित्या तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले आणि तिला स्पर्श करण्यास सुरुवात केली.

पीडितेने आरडाओरडा केला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या सहप्रवाशांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना घडली त्यावेळी रेल्वे त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याने हे प्रकरण कर्जत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT