M2M ferry travel experience Dainik Gomantak
महाराष्ट्र

M2M RORO Ferry: गाडी बोटीतून... प्रवास थाटातून! मुंबई-कोकण 'M2M' रो-रो फेरीचा अविस्मरणीय अनुभव पर्यटकानं केला शेअर Watch Video

M2M ferry travel experience: कोकणात गाडी घेऊन जाण्याची कल्पना पूर्वी फक्त स्वप्नातच शक्य होती. पण आता ‘M2M RORO Ferry’ मुळे हा प्रवास केवळ शक्य झाला आहे.

Sameer Amunekar

मुंबई : कोकणात गाडी घेऊन जाण्याची कल्पना पूर्वी फक्त स्वप्नातच शक्य होती. पण आता ‘M2M RORO Ferry’ मुळे हा प्रवास केवळ शक्यच नाही, तर अतिशय आरामदायी आणि थाटामाटातला ठरतो आहे. मुंबई ते कोकण मार्गावरील रो-रो सेवेचा सध्या प्रवास मुंबई ते मांडवा (अलिबाग) या मार्गावर सुरु आहे.

या प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव एका पर्यटकानं सोशल मीडियावर शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या @nusta_fir या इन्स्टाग्राम खात्यावरून प्रचंड व्हायरल झाला आहे.

पर्यटकानं सांगितलं की, “मी मुंबईतील भाऊचा धक्का येथून ‘M2M’ फेरीने मांडवा (अलिबाग) पर्यंत प्रवास केला. तिकिटे मी ऑनलाईन बुक केली होती. बोटीवर एकूण ६६५ प्रवाशांची व्यवस्था असून, ५० कार, ३० दुचाकी आणि लहान-मोठ्या बससुद्धा सहज नेऊ शकतो.”

रो-रो फेरीत चार वेगवेगळ्या क्लासेसची व्यवस्था

  1. इकोनॉमी क्लास : दर ₹२५००, एकूण ५५२ सीट्स. यामध्ये आरामदायी बैठक व्यवस्था आणि कॅफेची सुविधाही आहे.

  2. प्रीमियम क्लास : दर ₹५५००, ४४ सीट्स. अधिक प्रशस्त आसनं आणि आरामदायी वातावरण.

  3. बिझनेस क्लास : दर ₹७५००, ४८ सीट्स. एसी, मोबाईल चार्जिंग पॉइंट आणि उत्कृष्ट दर्जाचे बाथरूम यांसारख्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. सीटवर बसून भोजनाचीही व्यवस्था आहे.

  4. फर्स्ट क्लास : दर ₹९०००, १२ आलिशान सीट्स. समुद्र प्रवासाचा राजेशाही अनुभव देणारा हा क्लास अनेक पर्यटकांचा आवडता ठरत आहे.

फेरीमध्ये वाहन नेण्यासाठीही उत्तम सोय करण्यात आली आहे. दुचाकीसाठी शुल्क ₹१०००, कारसाठी ₹६०००, तर मिनी बससाठी ₹१३,००० आहे. प्रवासादरम्यान समुद्राचा नजारा, बोटीवरील सुखसोयी आणि शांत वातावरणामुळे हा प्रवास खरोखरच ‘थाटाचा अनुभव’ ठरतो.

या फेरी सेवेने मुंबई-कोकण प्रवासाचा चेहरामोहरा बदलला आहे. विशेषत: कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा सोयीस्कर, वेळ वाचवणारी आणि एक वेगळाच अनुभव देणारी ठरत आहे. सोशल मीडियावरही या सेवेबद्दल प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अनेक जण आता कोकण प्रवासासाठी ‘M2M RORO Ferry’ हाच पर्याय निवडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT