महाराष्ट्र

Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम

गोमन्तक डिजिटल टीम

मागील जवळपास पाच ते सात वर्षापासून कोकणातील रिफायनरीवरून वाद पहायला मिळत आहे. कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम असून, राजापूर तालुक्यातील गोवळ गावातील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. आज सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान काही काळ या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्री खातं देण्यात आले आहे. त्यानंतर रिफायनरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव या ठिकाणी रिफायनरी व्हावी यासाठी आता समर्थक सक्रिय झाले आहेत. तसेच, नाणार इथेही हा प्रकल्प व्हावा यासाठी नाणार इथले रिफायनरी समर्थक उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.

तर, दुसरीकडे राजापूर तालुक्यातील गोवळ गावात आज सर्व्हे कण्यात येणार होता. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

आंदोलकांची भूमिका पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे. सर्व्हेला परवानगी नसताना कशाप्रकारे काम करता? असा सवाल यावेळी स्थानिकांनी पोलिसांना केला. आंदोलनाचा निर्णय सध्या तात्पुरता मागे घेतलेला आहे. यापुढे असा प्रयत्न झाल्यास, पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नाणार इथला रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला होता. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव इथल्या जागेबाबत पत्र लिहिलं. त्यानंतर कोकणातल्या रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT