Goa Land Grabbing Case: गोवा तृणमूलकडून एसआयटीवर प्रश्नचिन्ह

तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी घेतला भाजपचा खरपूस समाचार
GOA TMC
GOA TMCDainik Gomantak

गोव्यात सध्या जमीन हडपण्याच्या प्रकरणावरुन राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोव्यातील जमीन बळकावण्याच्या प्रकरणाचा सुरु असलेल्या एसआयटी तपासावर गोवा तृणमूल काँग्रेसने आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तृणमूल नेते ट्रोजन डिमेलो यांनी म्हटले आहे की, हा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवा.

(Goa TMC Leader Trajano D'Mello slammed the Land Grabbing Case SIT for lack of impartiality, honesty and integrity of conduct )

GOA TMC
Mopa Airport Jobs: सर्वाधिक नोकऱ्या बिगर गोमंतकीयांना दिल्या - विजय सरदेसाई

याबाबत बोलताना डिमेलो म्हणाले की, एसआयटी तपास हा निःपक्षपातीपणे, प्रामाणिकपणे होत नसल्याचं निरीक्षण नोंदवले आहे. तसेच यावरुन एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. यावेळी भाजपाच्या कार्यपद्धतीवर ही भाष्य केले आहे. या चौकशीत गोवा सरकारने एसआयटीच्या संदर्भातील अटी जाहीर न केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले आहे, ज्यामुळे संपूर्ण तपास अधांतरी आहे का ? असे ही ते यावेळी म्हणाले.

यावेळी डिमेलो म्हणाले की एसआयटी तपास करताना राजकारण्यांसाठी एक अन् इतरांसाठी एक असं असता कामा नये ते सर्वांसाठी समान असायला हवे असे ते म्हणाले. त्यामूळे हा प्रश्न निकाली निघणार का ? निकाली निघाला तर तो न्यायपूर्ण असेल का ? असे ही ते यावेळी म्हणाले.

GOA TMC
Goa Accident : वेर्णा महामार्गावर मोठा अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

भाजपने फायद्यासाठी याचा दबावतंत्र म्हणून वापर करु नये - आमदार युरी आलेमाव

आमदार युरी आलेमाव यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, जमीन बळकावण्याच्या प्रकरणात राजकारण्यांचा सहभाग असेल तर भाजप सरकारने त्याचा राजकीय फायद्यासाठी दबावतंत्र म्हणून वापर करु नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर प्रकरणात सहभाग असलेल्या दोषींवर ताबडतोब कारवाई करावी आणि जमीन बळकाव प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com