Kudal Malvan Road Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kudal Accident: कुडाळ-मालवण मार्गावर बस आणि डंपरची समोरासमोर धडक; बसचालकासह प्रवासी जखमी

Kudal Malvan Road Accident: कुडाळ येथून मालवणच्या दिशेने निघालेली एसटी बस आणि धामापूरकडे जाणाऱ्या डंपर यांच्यात मंगळवारी (२० मे) दुपारी भीषण अपघात घडला.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग: कुडाळ येथून मालवणच्या दिशेने निघालेली एसटी बस आणि धामापूरकडे जाणाऱ्या डंपर यांच्यात मंगळवारी (२० मे) दुपारी भीषण अपघात घडला. हा अपघात चौके येथील नारायण वाडी परिसरात दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास झाला. समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मालवण आगाराची एसटी बस कुडाळहून मालवणकडे जात असताना, समोरून येणाऱ्या डंपरने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालक किरकोळ जखमी झाला असून, बसमधील काही प्रवाशांनाही दुखापत झाली.

तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि जखमींना नजीकच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले.

अपघातात बसच्या समोरच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच मालवण एसटी आगारातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बसचे चालक आणि वाहक यांनी अपघाताची माहिती आगारात दिली असून, एसटी प्रशासनाकडून अपघाताचा पंचनामा करून आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

SCROLL FOR NEXT