Konkan Railway Mumbai Goa Car Ferry Train Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Car Ferry Train: चाकरमान्यांनो, गणपतीक गावाक जावचो त्रास नाय...Konkan Railway सुरू करणार मुंबई-गोवा 'कार फेरी' सेवा

Konkan Railway Mumbai Goa Car Ferry Train: गणेशोत्सव हा कोकणातला सगळ्यात मोठा आणि भावनिक सण. याच निमित्ताने दरवर्षी हजारो चाकरमानी मुंबई, पुणे व अन्य शहरांतून गावी येतात.

Sameer Amunekar

Mumbai Goa Car Ferry Train

गणेशोत्सव हा कोकणातला सगळ्यात मोठा आणि भावनिक सण. याच निमित्ताने दरवर्षी हजारो चाकरमानी मुंबई, पुणे व अन्य शहरांतून गावी येतात. त्यांच्यासाठी कोकण रेल्वे दरवर्षी वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देते. यंदा मात्र कोकण रेल्वेकडून एक आगळी-वेगळी सेवा सुरू करण्यात येत आहे. आता स्वतःच्या गाडीला घेऊन तुम्ही थेट रेल्वेने मुंबईहून गोव्यापर्यंत प्रवास करू शकणार आहात.

ही कार फेरी सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होणार असून, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. या सेवेमुळे मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ २०-२२ तासांवरून केवळ १२ तासांवर येणार आहे. रस्त्याच्या खड्ड्यांपासून आणि प्रवासाच्या थकव्यापासून सुटका मिळणार असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सेवा कोलाड ते वेर्णा या मार्गावर धावणार आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये ४० गाड्या नेण्यात येणार असून, एका मार्गाचे शुल्क ७,८७५ रुपये इतके आहे.

गाड्या रेल्वेच्या विशेष डब्यात लावून घेऊन जाण्यात येणार आहेत. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गाड्या बेल्टने बांधल्या जातील आणि हँडब्रेक देखील लावले जातील. मात्र, प्रवासादरम्यान कोणालाही गाडीत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

गाडीबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळ्या डब्यात व्यवस्था करण्यात आली आहे. एका गाडीमागे जास्तीत जास्त तीन प्रवासी प्रवास करू शकतात. त्यात दोन प्रवासी 3AC डब्यात आणि एक प्रवासी SLR डब्यात. 3AC चे भाडे ९३५ रुपये, तर सेकंड क्लास (SLR) चे भाडे १९० रुपये इतके आहे.

दरवर्षी गणपतीच्या आधी कोकणात जाण्यासाठी एसटी बस, रेल्वे, खासगी गाड्या यांच्या बुकिंगसाठी झुंबड उडते. विशेष गाड्या, गणपती स्पेशल रेल्वे, कोकण रेल्वेच्या फेऱ्या, विमानसेवा यातून हजारो प्रवासी कोकणात दाखल होतात.

अनेक वेळा बुकिंग मिळवताना तासन्तास रांगा, ऑनलाइन तिकीट बुकिंगचा ताण-तणाव चाकरमान्यांना सहन करावा लागतो. तरीही, हा संघर्ष त्यांच्यासाठी आनंदाचा असतो कारण शेवटी ते आपल्याच मातीला भेटणार असतात. मात्र, कोकण रेल्वेच्या मुंबई-गोवा 'कार फेरी' सेवेमुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT