Konkan Railway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway Update: 21 तासांपासून रखडली कोकण रेल्वे, दरड हटविण्याचे काम अंतिम टप्यात

Konkan Railway Update: कोकणात सध्या पावसानं हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली.

Manish Jadhav

कोकणात सध्या पावसानं हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली. कोकण रेल्वे मार्गावर खेडजवळ कशेडी बोगद्यासमोर दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. मात्र आता दोन-तीन तासात कोकण रेल्वेची सेवा पूर्ववत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागील दोन-तीन तासांपासून दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. चिपळूणमध्ये मोठ्याप्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली आहे. तर काही तासांपासून इथे रखडेलेले प्रवासी ताटकळत बसले आहेत. चिपळूण प्लॅटफॉर्मवर 17 तांसापासून गुजरातला (Gujarat) जाणारी रेल्वे थांबलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून माती आणि चिखल काढण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसान धूमशान घातलं आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या पावसाचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे उन्मळून ट्रॅकवर पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

दुसरीकडे, कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) कोणत्या गाड्या रद्द केल्या तर अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या. प्रवाशांना गाड्या रद्द आणि मार्ग बदलल्याने मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. गेल्या 12 तासांपासून प्रवासी ताटकळत रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT