कोकण रेल्वे Konkan Railway Official Account
महाराष्ट्र

Ganpati Special Trains 2024: गणेशोत्सवानिमित्त Konkan Railway सोडणार विशेष ट्रेन; वेळापत्रक काय, Ticket Booking कधीपासून?

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway Ganpati Special Trains 2024

मुंबई : गणपतीनिमित्त रत्नागिरी, सावंतवाडी, चिपळूणला जाणाऱ्या प्रवाशांना कोकण रेल्वेने दिलासा दिलाय. कोकण रेल्वेने गणपती विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून २१ जुलैपासून या ट्रेनचे आरक्षण सुरू होणार आहे. १ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत एकूण ७ ट्रेन धावणार आहेत.

यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. मे महिन्यातच कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले होते. एक ते सहा सप्टेंबर या कालावधीतील रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची क्षमताही संपली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने शुक्रवारी गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले.

मे- जून महिना उजाडला की मुंबई, ठाणे, डोंबिवली या भागात राहणाऱ्या कोकणवासियांना गणपतीचे वेध लागतात. या प्रवाशांची पहिली पसंती रेल्वेला असते. मात्र, प्रवाशांची संख्या पाहता कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण उपलब्ध नसते.

  • गणपती विशेष रेल्वेगाड्यांची यादी (Ganpati Special Trains 2024 List, Timetable, Station)

  • मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी स्पेशल (दररोज)

गाडी क्रमांक : 01151

मुंबई CSMT वरून 00.20 (रात्री १२ वाजून २० मिनिटांनी) वाजता सुटणार

सावंतवाडी रोड येथे 14.20 (दुपारी २ वाजून २० मिनिटांनी) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01152

सावंतवाडी रोड येथून 15.10 (दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी)  वाजता सुटेल

मुंबई CSMT येथे 03.45 (रात्री तीन वाजून ४५ मिनिटांनी) वाजता पोहोचणार

थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

एकूण डबे: 20.  थ्री टियर एसी - 02 डबे, स्लीपर - 12 डबे, जनरल - 04 डबे, एसएलआर - 02 डबे

  • मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी - मुंबई सीएसएमटी स्पेशल (दररोज)

गाडी क्रमांक : 01153

मुंबई CSMT वरून 11.30 (सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी) वाजता सुटणार

रत्नागिरी येथे 20.10  (रात्री ८ वाजून १० मिनिटांनी) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01154

रत्नागिरी येथून 04.00 (पहाटे चार) वाजता सुटणार

मुंबई CSMT येथे 13.30 (दुपारी १ वाजून १० मिनिटांनी) वाजता पोहोचणार

थांबा : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करणजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

एकूण डबे – 20.

थ्री टियर एसी - 02 डबे, स्लीपर - 12 डबे, जनरल - 04 डबे, एसएलआर - 02 डबे.

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्पेशल (दररोज)

गाडी क्रमांक : 01167

लोकमान्य टिळक टर्मिनस वरून 21.00  (रात्री नऊ) वाजता सुटणार

कुडाळ येथे 09.30  (सकाळी ९ वाजून ३० मिनिटे) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01168

कुडाळ येथून 12.00 (दुपारी १२) वाजता सुटणार

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 00.40  (रात्री १२ वाजून ४० मिनिटे) वाजता पोहोचणार

थांबा :  ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग

एकूण डबे – 20.

थ्री टियर एसी - 02 डबे, स्लीपर - 12 डबे, जनरल - 04 डबे, एसएलआर - 02 डबे.

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्पेशल (दररोज)

गाडी क्रमांक : 01171

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 08:20  (सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी) वाजता सुटणार

कुडाळ येथे 21:00  (रात्री ९) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01172

कुडाळ येथून 22:20  (रात्री १० वाजून २० मिनिटे) वाजता सुटणार

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 10:40  (सकाळी १० वाजून ४० मिनिटे) वाजता पोहोचणार

थांबा :  ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

  • दिवा जंक्शन - चिपळूण - दिवा जंक्शन मेमू स्पेशल   

गाडी क्रमांक : 01155

दिवा जंक्शन येथून 07:15 (सकाळी ७ वाजून १५ मिनिटे) वाजता सुटणार

चिपळूण येथे 14:00  (दुपारी दोन) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01156

चिपळूण येथून 15:30   (दुपी ३ वाजून ३० मिनिटे) वाजता सुटणार

दिवा जंक्शन येथे 22:50  (रात्री १० वाजून ५० मिनिटे) वाजता पोहोचणार

थांबा :  निळजे, तलोजा पंचानंद, कळंबोली, पनवेल, सोमतने, रसयानी, आपटा, जिठे, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निधी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करणजाडी, विंहेर, दिवाणखवटी, कालांबणी बुद्रुक, खेड आणि आंजनी

एकूण डबे – 12 कार मेमू

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्पेशल

गाडी क्रमांक : 01185 (सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी)

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00:45  (सकाळी ७ वाजून १५ मिनिटे) वाजता सुटणार

कुडाळ येथे 12:30   (दुपारी १२ वाजून ३० मिनिटे) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01186

कुडाळ येथून 16:30   (संध्याकाळी चार वाजून ३० मिनिटे) वाजता सुटणार

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 04:50  (पहाटे ४ वाजून ५० मिनिटे) वाजता पोहोचणार

थांबा :  ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) स्पेशल (साप्ताहिक)

गाडी क्रमांक : 01165 - दर मंगळवारी

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00:45  (सकाळी ७ वाजून १५ मिनिटे) वाजता सुटणार

कुडाळ येथे 12:30   (दुपारी १२ वाजून ३० मिनिटे) वाजता पोहोचणार

गाडी क्रमांक  : 01166

कुडाळ येथून 16:30   (संध्याकाळी चार वाजून ३० मिनिटे) वाजता सुटणार

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 04:50  (पहाटे ४ वाजून ५० मिनिटे) वाजता पोहोचणार

थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग    

आरक्षणासाठी कसे करता येईल? (Ganpati Special Train Bookings Open Date)

21 जुलैपासून या रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू होईल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच रेल्वेच्या आरक्षण केंद्र तसेच IRCTC या वेबसाईटवरून ऑनलाइन आरक्षित तिकीट काढता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

Actor​ Vijay Thalapathy​: विजय थलपतीने मोडला किंग खानचा रेकॉर्ड! जाणून घ्या

ArQhive: गोव्यातील कला, इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचा अनोखा संगम 'अर्-क्वाइव्ह'

SCROLL FOR NEXT