Konkan Railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड! कोकण रेल्वेच्या 11 गाड्यांना विलंब, प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत

Railway Service Disruption In Maharashtra: रत्नागिरी ते राजापूरदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या 11 गाड्यांना मोठा फटका बसला.

Manish Jadhav

Konkan Railway Disruption Overhead Wire Fault Trains Delayed

कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी (22 मार्च) वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा बसला. रत्नागिरी ते राजापूरदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे या मार्गावरील 11 गाड्यांना मोठा फटका बसला. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक विस्कळीत झाली. मात्र प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

मिळालेल्या माहितीनुसार, हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलमदरम्यान धावणारी मंगला एक्सप्रेस वेरवली येथे पोहोचली असता गाडीचा पॅन्टोग्राफ ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तारेत अडकल्याने ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. यामुळे मडगाव-मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह 11 गाड्या मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडल्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला.

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत

दरम्यान, कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली. या वाहतूक कोंडीमुळे अडकून पडलेली राजधानी एक्सप्रेस पहिल्यांदा रवाना करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांना थोडसं हायसं वाटलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

SCROLL FOR NEXT