konkan railway 14 summer special trains released by central railway for konkan region  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकण प्रवासासाठी दिलासा, विशेष 14 रेल्वे गाड्यांची तरतूद

या विशेष गाड्या 7 एप्रिलपासून ते 20 एप्रिलदरम्यान धावणार

दैनिक गोमन्तक

कोकण रेल्वेने 24 मार्चनंतर विजेवर धावणार्या गाड्या सुरू केल्या आहेत. रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यातील चाचणी 22 आणि 24 मार्चला पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता लवकरच कोकण रेल्वेवर सगळ्या गाड्या विजेच्या इंजिनवर धावत आहेत.

गेल्याच महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची चाचणी झाली. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्यामुळे सध्या रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे.

दरम्यान, अशातच आता कोकण रेल्वेने (konkan railway) उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान 14 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 7 एप्रिलपासून ते 20 एप्रिलदरम्यान धावणार आहेत. या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाईटवर सुरू झाली आहे

या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा येथे थांबणार आहेत. तसेच आरवली रोड, संगमेश्वर रोड, अडवळ, विलवडे. राजापूर रोड. वाभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर देखील या गाड्या थांबणार आहेत. या गाड्यामध्ये 22 कोच फर्स्ट एसी तसेच - 01 कोच, 2 टियर एसी - 03 कोच अशी सुविधा असणार आहे.

तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्याने मध्य रेल्वेने मुंबई-कोकण (konkan) आणि मुंबई-नागपूर मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीदरम्यान 14 फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर-मालदादरम्यान 36 फेऱ्या धावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; 6 रुग्ण आढळले, एकाची प्रकृती गंभीर

200 रुपयांवरून वाद, स्कुटर परत करायला आलेल्या जोडप्याला शिवीगाळ, सोन्याच्या कड्याने हल्ला; नेमकं प्रकरण काय?

Shivaji Maharaj Navy: ..गोवा पार केला, पोर्तुगीजांना ‘हर हर महादेवने जाग आली; शिवाजी महाराजांची एकमेव नौदल मोहीम

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचे 15 दिवसांचे अधिवेशन; कोणती विधेयके मंजूर? वाचा सविस्तर आढावा

Shravan In Goa: गूळ-खोबऱ्याच्या पातोळ्या, तोणियाची भाजी, ब्राह्मीची चटणी; श्रावणातला आहार

SCROLL FOR NEXT