Ganeshotsav Konkan Railway Train Booking Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: चाकरमान्यांनो, तयारीक लागा... गणपतीक गावाक जावचा आसा मा! 'या' तारखेपासून नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू

Ganeshotsav 2025: गणेशोत्सव आणि कोकणातील चाकरमानी यांचं नातं अगदी जिव्हाळ्याचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या बाप्पासाठी कोकणात जाण्याची तयारी सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

Ganeshotsav 2025 Konkan Railway Train Booking

सिंधुदुर्ग: गणेशोत्सव आणि कोकणातील चाकरमानी यांचं नातं अगदी जिव्हाळ्याचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या बाप्पासाठी कोकणात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी २३ जूनपासून नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी लवकर आल्याने गावी जाण्याची तयारी लवकर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने २३ जूनपासून नियमित गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आदी भागांतून कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणपती हे कोकणातील सर्वात मोठा सण आहे. या सणासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. याच ओघात रेल्वे प्रशासन दरवर्षी स्पेशल गाड्या आणि आरक्षण सुविधा उपलब्ध करून देत असते. यंदा गणेशोत्सव जरा लवकर आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने वेळेत नियोजन करत आरक्षण प्रक्रियेची लवकर सुरुवात केली आहे.

गणपतीसाठी विशेष गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासून सुरू होणार असून, प्रवाशांनी नियोजनपूर्वक आरक्षण करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी म्हणजेच २५ आणि २६ ऑगस्टच्या गाड्यांसाठी सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे या तारखांसाठी तिकिट आरक्षण लवकरात लवकर करून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती, तर यंदा हा उत्सव २७ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे चाकरमान्यांची जायची तयारी लवकरच सुरू होईल, हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आगाऊ पावले उचलली आहेत. ६० दिवस आधी आरक्षणाची प्रक्रिया सुरू करून प्रवाशांना सुलभ आणि नियोजित प्रवासाची संधी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT